सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शिवसेना शाखाप्रमुख.महेश मल्लेकर व युवा सेना विभाग प्रमुख रोहित साळवे यांचाअंसख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश


औरंगाबाद(प्रतीनीधी)
    कोटला कॉलनी वार्ड क्रमांक 67 चे शिवसेना शाखाप्रमुख महेश मल्लेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे दुरदृष्टी असलेले विचार , संघटनात्मक ताकद व देशात सर्वात जास्त सभासद असलेला पक्ष अशा विविध विषयांना प्रेरीत होऊन खासदार डॉ भागवत कराड, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष . संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश केला. 

   शिवसेनेचे शाखाप्रमुख  महेश मल्लेकर यांच्या सह युवा सेना विभाग प्रमुख  रोहित साळवे, उपशाखा प्रमुख .अविनाश जगताप, उपशाखा .नितेश लांडगे, गटप्रमुख . साजन भद्रे, गटप्रमुख .शरद गवळी, गटप्रमुख .रुपेश खरे, गटप्रमुख .प्रवीण वाघमारे,गट प्रमुख .शैलेश धुपे, सह गटप्रमुख श्दीपक गोडसे, सहगट प्रमुख राहुल विश्वासू या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश केला.
        याप्रसंगी खासदार डॉ भागवत कराड, शहराध्यक्ष .संजय केनेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य मनोज पांगरकर, अनिल मकरीये, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष .एजाज देशमुख, शहर सरचिटणीस श्री.समिर राजूरकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.माधुरीताई अदवंत, शहर उपाध्यक्ष .दयाराम बसैये, शहर उपाध्यक्ष सौ.लताताई दलाल, मनिषाताई भन्साली, शहर उपाध्यक्ष .जगदिश सिध्द, महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ.अमृता ताई पालोदकर, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष श्री.बबन नरवडे, मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य .हर्षवर्धन कराड, मंडळ अध्यक्ष.सिध्दार्थ साळवे, युवा शहर उपाध्यक्ष .पवन सोनवणे, .चंपक गायकवाड, .प्रेम कलवले आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत