माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून परतूर, मंठा, नेर ग्रामीण रुग्णालयांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी,आय सी यू व्यवस्थेसह सिटीस्कॅन व्हेंटिलेटर बेड एक्स-रे मशीन आदी सुविधा होणार उपलब्ध,*परतूर ग्रामीण रुग्णालयात कोरोना हॉस्पिटलच्या अठरा ऑक्सीजन खाटांचे उद्घाटन,3054 व 25/15 चा आमदारांना देण्यात येणारा निधी ग्रामीण रुग्णालयात अद्यावत सुविधा वाढवण्यासाठी सरकारने खर्च करावा

 परतूर (प्रतिनिधी परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने राज्याचे माजी मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून दीड कोटी रुपये निधी जाहीर केला असून या निधीमधून परतूर मंठा व नेर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन मशिन ,व्हेंटिलेटर बेड, एक्स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देणार असल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले 
ते परतूर येथे  ग्रामीण रुग्णालयातील 18 ऑक्सिजन बेडचे कोरोना हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते 
पुढे बोलताना ते म्हणाले की कोरोना रुग्णांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे करिता सर्वप्रथम आपण आपल्या आमदार फंडाचा निधी या कामासाठी खर्च करीत असल्याचे सांगितले कोरोना चा वाढता प्रादुर्भाव ग्रामीण भागामध्ये वाढती लोकसंख्या ही गोष्ट लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की जिल्ह्यातील तालुका स्तरावर कोविड हॉस्पिटल नसल्यामुळे रुग्णांना थेट जालन्याला जावे लागते त्यामुळे जिल्ह्यावरील रुग्णालयात बेड भेटणे कठीण होते बेड अभावी अनेकांना प्राण गमवावे लागतात आपण याची गंभीर दखल घेत यासंदर्भात सततचा पाठपुरावा करत या ठिकाणी ग्रामीण रुग्णांसाठी व्यवस्था उभी करण्यासाठी पुढाकार घेतला आधारवड फाउंडेशन ने या कामामध्ये पुढाकार घेत पाच लक्ष रुपये मदत केली असून त्यांच्या कामाचे कौतुक यावेळी आमदार लोणीकर यांनी केले पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की
   पुढे बोलताना ते म्हणाले की अरोग्य सुविधा वाढवण्या साठी दर वर्षी 2 कोटी रुपये निधी खर्च करण्याची परवानगी सरकार ने द्यावी जेणे करून  उत्तम आरोग्य सुविधा जनतेला उपलब्ध होतील असेही ते म्हणाले
======================
*3054 व 25/15 चा आमदारांना देण्यात येणारा निधी ग्रामीण रुग्णालयात अद्यावत सुविधा वाढवण्यासाठी सरकाने खर्च करावा*
=======================
 राज्य सरकारने  3054 व 25/ 15  या हेड खाली आमदारांना दिला जाणारा निधी ग्रामीण रुग्णालयात अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करावा असे सांगतानाच सरकार मधील आमदारांची प्रत्येकी 5 कोटी व विरोधी पक्षातील आमदारांना प्रत्येकी 1 कोटी निधी विकास कामावर खर्च न करता ग्रामीण रुग्णालयात कोविड संदर्भातील अद्यावत सुविधा साठी खर्च करण्याची मागणी या वेळी आमदार लोणीकर यांनी केली
=======================
*विकास कामे करायला खूप कालावधी आहे मात्र हाच निधी जनतेचे प्राण वाचवण्यासाठी खर्च करण्याची गरज*
=======================
मंत्री ,आमदार यांना विकास कामासाठी पुष्कळ वेळ आहे मात्र आज कोरोनाच्या या भयानक संकटात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत अशा परिस्थितीमध्ये सरकारने योग्य भूमिका घेत वैद्यकीय सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे राज्यातील सर्व आमदारांचा फंड यासह विकास कामासाठी दिला जाणारा वेगवेगळ्या प्रकारचा निधी या कामासाठी वापरण्याची गरज असून आपण आपला संपूर्ण फंड या कामासाठी देण्यास तयार असल्याचे ते म्हणाले
=======================
 *जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांचा केला सत्कार*
=======================
कोविड हॉस्पिटल चे उद्घाटन प्रसंगी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी ग्रामीण रुग्णालय परतूर येथील परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
=======================
*केंद्राने दिलेल्या लसी वरच महाराष्ट्र क्रमांक एक वर*
======================
केंद्राने दिलेल्या लसी वरच महाराष्ट्र राज्य क्रमांक एक वर असून विनाकारण काही लोक आपली पाठ थोपटून घेत असल्याचे सांगतानाच महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक लस पुरवठा केंद्राने केल्यामुळेच आज राज्य क्रमांक एक वर असल्याचे ते म्हणाले

*पंतप्रधान सहाय्यता निधी सी एस आर फंड, डी पी सी चा निधी जिल्हा रुग्णालया साठीच न वापरता ग्रामीण रुग्णालयावर खर्च करून ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात*
,====================
केंद्र सरकारचा पंतप्रधान सहाय्यता निधी सीएसआर फंड त्याचबरोबर डीपीसी चा निधी जिल्हा आरोग्य केंद्रावरच खर्च करण्यात आला मात्र हा निधी ग्रामीण भागातील तालुका स्तरावर असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय सुविधा वाढवण्यासाठी खर्च करण्याची गरज असून यामुळे ग्रामीण भागामध्ये होणारा कोरोना चा प्रसार रोखण्यास मदत होईल व जिल्हा रुग्णालयावर अतिरिक्त ताण येणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले या संदर्भामध्ये आपण वेळोवेळी पत्रव्यवहार करून ग्रामीण रुग्णालयावर निधी खर्च करण्यात यावा अशी मागणी केली होती असेही ते म्हणाले
======================
*परतूर येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी आपण सतत प्रयत्नशील*
=======================

आपण मंत्री असताना परतूर येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते हे प्रयत्न करत असताना तीन वेळा तात्कालीन आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या दालनामध्ये बैठका घेण्यात आल्या होत्या उपजिल्हा रुग्णालय याचा परिपूर्ण प्रस्ताव असतानाही तो त्यावेळी आरोग्य मंत्र्यांच्या उदासीनतेमुळे निकाली निघाला नाही मात्र यासाठी आपण आताही प्रयत्न करत असून या संदर्भामध्ये आरोग्य संचालक आरोग्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करून परतूर येथे उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता देण्या ची मागणी केली असल्याचेही ते म्हणाले
यावेळी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव तहसीलदार रूपा चित्रक विलासराव आकात बद्रीनारायण ढवळे अशोकराव बुरकुले नगरसेवक संदीप बाहेकर प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे प्रवीण  सातोनकर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष छत्रगुन कणसे लक्ष्मणराव टेकाळे रमेश राव केव्हा रे सुरेश राव सोळंके यांच्यासह कार्यकर्ते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानदेव नवल डॉक्टर काळे डॉक्टर अंभोरे यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती