पीक कर्जासाठी ऑनलाइन ऐवजी गाव स्तरावरच ऑफलाइन पद्धत राबवा, भाजपा युवा मोर्चाची मागणी


 
परतूर (प्रतीनीधी) पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पीक कर्जाचे अर्ज गाव स्तरावर तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जमा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी परतूर तालुका भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने करण्यात आली आहे. 
माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या सूचनेवरून तसेच युवामोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे. 
कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात सगळीकडे संचार बंदी लागू आहे. ग्रामीण भागात ऑनलाइनच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत.अशा स्थितीत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. अर्ज ऑनलाइन करण्यासाठी शेतकाऱ्यांकडून १०० रुपये एवढे शुल्क खाजगी दुकानदारांकडून आकारले जाते. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय एकाच वेळी अनेक शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी येत असल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. वरील सर्व अडचणी लक्षात घेऊन पीक कर्जासाठी प्रत्येक गाव स्तरावर नियुक्त तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्या कडे पीक कर्जाचे प्रस्ताव स्वीकारण्याची व्यवस्था करावी, जेणे करून शेतकऱ्यांना गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार नाही. गावामध्ये कागदपत्रांची जुळवा जुळव करणे सोपे जाईल.
गावस्तरावर जमा झालेले अर्ज प्राधान्यक्रमानुसार बँकेत जमा करावे, बँकांनी त्यांच्या कडे आलेल्या अर्जावर कार्यवाही करून एका एका शेतकऱ्याला बँकेत बोलवावे. बँकेत होणारी गर्दी या मुळे कमी होण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन जिल्ह्याधिकारी आणि अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी ऑनलाईन अर्जांची पद्धत बंद करून ऑफलाईन पद्धतीने गाव स्तरावर अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

निवेदनावर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघन कणसे भाजपा तालुका उपाध्यक्ष वसंतराव बेरगुडे नगरसेवक प्रकाश चव्हाण,कृष्णा अरगडे सरपंच केशव ढवळे,बंडू भुंबर,विकास सवणे,सिद्धेश्वर बोरकर,केशव आघाव, प्रकाश सवणे, संजय अवचार, हनुमंत चिखले,गणेश कणसे आदींची  उपस्थिती होती.

फोटो ओळी : परतूर येथील एसबीआयचे  शाखा व्यवस्थापक रवींद्र डोंगरे यांना आपल्या मागण्याचे निवेदन देतांना युवामोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, भाजपा ता.उपाध्यक्ष वसंतराव बेरगुडे, नगरसेवक कृष्णा आरगडे, केशव ढवळे, बंडू भूंबर.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती