Posts

Showing posts from July, 2021

अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी,शासनाच्या आदेशाची वाट न पाहता आपत्ती व्यवस्थापननुसार अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे करा मदत द्यायची किंवा नाही ते सरकार ठरवेल - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला सूचना

Image
परतूर(प्रतिनिधी) मागील आठ ते दहा दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून पावसामुळे नुकतीच पेरणी करण्यात आलेले सोयाबीन सह इतर पिके पिवळी पडत असून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे अगोदरच शेतकरी संकटात असताना पुन्हा अस्मानी संकटाने देखील शेतकऱ्यांवर खूप मोठा आघात केला आहे अशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे अतिवृष्टी गारपीट ढगफुटी भूकंप यासारखी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास सरकारने सजग राहून तात्काळ पंचनामे करणे बाबत आदेशित करणे आवश्यक आहे परंतु महा विकास आघाडी सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्यासंदर्भात आदेश दिले नाहीत त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला महाविकास आघाडी सरकार काहीही करत नाही ही बाब भाजपा किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावेळी आपत्ती व्यवस्थापनानुसार शासनाच्या आदेशाची वाट न पाहता जिल्हाधिकारी स्तरावर संब

गाव तिथं शाखा आणि घर तेथे शिवसैनिक तयार करा - जिल्हाप्रमुख बोराडे

Image
परतूर /प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसंपर्क आभियान मोहीम दि.१२ जुलै ते २४ जुलै दरम्यान राबवण्यात येत   असून परतूर शहरातील डाँ.आण्णाभाउ साठे नगर येथे शिवसंपर्क अभियान अंतर्गत परिसरातील शिवसैनिक व नागरीकांशी बैठकीद्वारे संवांद साधण्यात आला. यात जिल्हाप्रमुख बोराडे यांनी सांगितले की , मुख्यमंत्री यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा व घर तेथे शिवसैनिक तयार झालाच पाहिजे येणाऱ्या काळात नगरपालिका निवडणुका होत आहेत यासाठी बुथ बांधणी पासून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी  तयारी केली पाहिजे तसेच शहरातील संपूर्ण शाखा तयार केल्या पाहिजेत.शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या लोकहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठीही आव्हान याप्रसंगी बोराडे यांनी केले. या आव्हानास शिवसैनिकांनी व नागरीकांनी  उत्तम प्रतिसाद दिला.यावेळी जालना जिल्हा प्रमुख ए. जे. बोराडे, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, जिल्हाउपप्रमुख बाबाजी तेलगड ,तालुका प्रमुख अशोकराव आघाव,शहर प्रमुख दत्ता सुरुंग

डाँ. आण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त परतूरात आभिवादन

Image
 परतूर (प्रतिनिधी) लोकशाहीर ,साहित्यसम्राट , डाँ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त परतूर येथील अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ,साठे नगर येथे अभिवादन करण्यात आले. यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले  डाँ.अण्णाभाऊ साठे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक बाबुराव हिवाळे ,पत्रकार दीपक हिवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानाभाऊ कासारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश हिवाळे, देवराव हिवाळे, अशोक दशरथ हिवाळे ,लक्ष्मण साठे, प्रकाश गायकवाड, गणेश गायकवाड, अरुण गायकवाड व किशोर धोञे उपस्थित होते.

सरपंच परिषद व भाजपा नगरसेवकांचे आमदार लोनिकरांसह ,जिल्हाधिकारी,एस.पी नां निवेदन,साई बाबा मंदिरा समोरील चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव द्या व मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीला परवानगी द्या,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी केली चर्चा, लोणीकर घेणार पुढाकार परिषदेला केले आश्वस्त

Image
परतूर(प्रतिनिधी) परतूर शहरातील साई मंदिरासमोरील वाटूर परतुर परतूर सेलू रस्त्यावरील चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या व साईबाबा मंदिराच्या लगतच्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वरुढ पुतळा उभारण्यास परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन सरपंच परिषद व व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व तालुकाध्यक्ष यांनी आमदार बबनराव लोणीकर यांच्या सह, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले या निवेदनामध्ये म्हटले आहे की परतूर शहरासह मंठा परतूर तालुक्यातील शिवभक्तांची छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा परतूर शहरामध्ये उभारण्यात यावा अशी गेल्या अनेक वर्षापासून ची मागणी असून वाटूर परतुर तसेच परतूर सेलू रस्त्यावर असणाऱ्या शहरातील चौका चे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करा त्याच बरोबर शहराच्या दर्शनी भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून सौंदर्यीकरण करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे पुढे या निवेदनात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा साईबाबा मंदिराच्या लगत च्या जागेत केल्यास हा शहराचा अतिशय महत्त्वपूर्ण भ

परतुरमध्ये महाराजांच्या जागेवर बांधकाम कराल तर? सबंधीत अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासु- सिध्देश्वर काकडे

परतुर: परतुर शहरातील साई बाबा मंदिर परीसरा समोरील जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात येणार आसुन मेघ इंजीनिअरिंग या बांधकाम कंपणीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विरोध दिसुन आला आहे. आपण कोणाच्या पुतळ्याला विरोध करत आहात. याचे भान मेघ इंजीनिअरिंग कंपणीला आहे का? आसा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिध्देश्वर काकडे यांनी केला आहे. मंठा परतुर मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे मंत्री पद आसतांना या साई बाबा मंदिर समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी आपण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मागणी केली होती. या मागणीची दखल अनेकांनी घेतली होती. व तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे दैवत आहेत. यामुळे सर्वांनी या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी पसंती दिली आहे. पण मेघ इंजीनिअरिंग हि बांधकाम करणारी कंपणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध दर्शवित आहे. या जागेवर तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे शिवभक्तांच्या भावनांचा उद्रेक प्रशासनाला बघायला मिळे

डॉक्टर्स डे निमित्त प्रा.सहदेव मोरे पाटील यांच्या वतीने मंठा येथे डॉक्टरांचा सत्कार

Image
मंठा(प्रतिनि धी) कोविड काळात आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा देणार्‍या डॉक्टरांचा डॉक्टर्स डे चे निमित्त साधून प्रा. सहदेव मोरे पाटील यांच्या वतीने पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  प्रसंगी मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेश मोरे, शरद मोरे, भाजपा तालुका सरचिटणीस नारायण दवणे, श्याम टाके, चंद्रकांत बोराडे, विनायक चव्हाळ, नारायण राठोड, योगेश देशमुख, विशाल वायाळ यांची उपस्थिती होती.  कोवीड काळात आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टरांनी रुग्ण सेवा केली.  प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्णांची सेवा केली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी अशी सुचना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांनी केली होती त्या सूचनेनुसार प्रा.सहदेव मोरे पाटील यांनी मंठा शहरातील डॉक्टरांना कृतज्ञतापर प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन आज डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा दिल्या.  ============= आपण समाजाचे देणे लागतो या भूमिकेतून प्रत्येक जण काम करत असतो, समाजकारणात मी सुद्धा या समाजाचे देणे लागतो या