सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

गाव तिथं शाखा आणि घर तेथे शिवसैनिक तयार करा - जिल्हाप्रमुख बोराडे


परतूर /प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसंपर्क आभियान मोहीम दि.१२ जुलै ते २४ जुलै दरम्यान राबवण्यात येत   असून परतूर शहरातील डाँ.आण्णाभाउ साठे नगर येथे शिवसंपर्क अभियान अंतर्गत परिसरातील शिवसैनिक व नागरीकांशी बैठकीद्वारे संवांद साधण्यात आला. यात जिल्हाप्रमुख बोराडे यांनी सांगितले की , मुख्यमंत्री यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा व घर तेथे शिवसैनिक तयार झालाच पाहिजे येणाऱ्या काळात नगरपालिका निवडणुका होत आहेत यासाठी बुथ बांधणी पासून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी  तयारी केली पाहिजे तसेच शहरातील संपूर्ण शाखा तयार केल्या पाहिजेत.शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या लोकहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठीही आव्हान याप्रसंगी बोराडे यांनी केले. या आव्हानास शिवसैनिकांनी व नागरीकांनी  उत्तम प्रतिसाद दिला.यावेळी जालना जिल्हा प्रमुख ए. जे. बोराडे, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, जिल्हाउपप्रमुख बाबाजी तेलगड ,तालुका प्रमुख अशोकराव आघाव,शहर प्रमुख दत्ता सुरुंग ,  शहर प्रमुख (गाव) विदुर जईद ,युवासेना शहर प्रमुख सोनाजी भोकरे ,मधुकर पाईकराव, युवासेना शहर प्रमुख राहुल कदम, बापु घटमाळ, आबासाहेब कदम,लखन हिवाळे , साहेबराव पवार,अण्णा पवार यांची उपस्थिती होती. बैठक यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहर उपप्रमुख दिपक हिवाळे ,दलीत आघाडी शहरप्रमुख सर्जेराव हिवाळे,कामगार सेना शहर प्रमुख अशोक हिवाळे,व कामगार सेना भगवान घोडे यांनी विशेष परीश्रम घेतली.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत