सरपंच परिषद व भाजपा नगरसेवकांचे आमदार लोनिकरांसह ,जिल्हाधिकारी,एस.पी नां निवेदन,साई बाबा मंदिरा समोरील चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव द्या व मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीला परवानगी द्या,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी केली चर्चा, लोणीकर घेणार पुढाकार परिषदेला केले आश्वस्त


परतूर(प्रतिनिधी)
परतूर शहरातील साई मंदिरासमोरील वाटूर परतुर परतूर सेलू रस्त्यावरील चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या व साईबाबा मंदिराच्या लगतच्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वरुढ पुतळा उभारण्यास परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन सरपंच परिषद व व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व तालुकाध्यक्ष यांनी आमदार बबनराव लोणीकर यांच्या सह, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले
या निवेदनामध्ये म्हटले आहे की परतूर शहरासह मंठा परतूर तालुक्यातील शिवभक्तांची छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा परतूर शहरामध्ये उभारण्यात यावा अशी गेल्या अनेक वर्षापासून ची मागणी असून वाटूर परतुर तसेच परतूर सेलू रस्त्यावर असणाऱ्या शहरातील चौका चे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करा त्याच बरोबर शहराच्या दर्शनी भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून सौंदर्यीकरण करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे पुढे या निवेदनात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा साईबाबा मंदिराच्या लगत च्या जागेत केल्यास हा शहराचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग असून येथूनच शहरात ग्रामीण भागातील नागरिक प्रवेश करत असतात प्रवेशद्वारावरच छत्रपतींचा पुतळा उभारल्यास शिवभक्तांच्या भावनांचा आदर राखला जाईल व तमाम शिवप्रेमींना आत्मिक समाधान मिळेल त्यामुळे या परिसरामध्ये पुतळा उभारण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे
ऐतिहासिक असलेल्या परतुर शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणे गरजेचे असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे शिवभक्तांची इच्छा पूर्ण होण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे त्यामुळे हा पुतळा उभारण्यास परवानगी द्यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर शिवछत्रपतींच्या पुतळा उभारणीसाठी पर्याय म्हणून शासकीय  विश्रामग्रह समोरील जागा ही उपयुक्त असून शहरात साकारत असलेल्या नाट्यग्रह परिसरात पाच एकर जागा उपलब्ध आहे हा एक पर्याय होऊ शकतो परंतु सर्व शिवभक्तांचे साईबाबा मंदिर परिसराला प्राधान्य असून या परिसरात पुतळा उभारण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे
=======================
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी संदर्भात आमदार लोणीकरांशी चर्चा*
=======================
छत्रपती शिवाजी महाराजांचा साईबाबा मंदिर परिसरात पुतळा उभारण्यास संदर्भामध्ये माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन या शिष्टमंडळाने निवेदन सादर करण्याबरोबरच सुमारे एक तास चर्चा केली या चर्चेदरम्यान माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी परतुर शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आवश्यकता असून साईबाबा मंदिरासमोरील सावकास छत्रपती शिवाजी चौक असे नामकरण करून साई मंदिराच्या बाजूला पुतळा उभारण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगतानाच या कामामध्ये आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले पुढे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या माध्यमातून मतदार संघातील सर्व शिवभक्तांना आत्मिक समाधान लाभेल यासह शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडेल असे सांगतानाच या कामासाठी शासकीय स्तरावरील सर्व नियम सर्वोच्च न्यायालयाने पुतळ्या संदर्भामध्ये आखून दिलेल्या चौकटीत सर्व परवानग्या मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या माध्यमातून पुतळा बसवण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे  ते म्हणाले

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पावित्र्य जपण्यासाठी साईबाबा मंदिराच्या लगत ची जागा सर्वोत्तम*
=======================
परतूर शहरात येणाऱ्या वाटुर परतूर व सेलू परतूर रस्त्याच्या अगदी दर्शनी भागामध्ये साई मंदिराच्या लगतच्या जागेत पुतळा उभारणी केल्यास छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखले जाईल याकडेही यावेळी आलेल्या शिष्टमंडळाचे लक्ष माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वेधले
यावेळी सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, सरपंच परिषदेचे जालना जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न कणसे ,भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रमेश भापकर नगरसेवक प्रकाश चव्हाण, प्रवीण सातोनकर, कृष्णा अरगडे अडव्होकॅट 
 जगन बागल सरपंच परिषदेचे परतुर तालुका अध्यक्ष प्रफुल शिंदे सरपंच परिषदेचे मंठा तालुका अध्यक्ष माऊली गोडगे यांचा शिष्टमंडळात समावेश होता

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.