सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

तळणि येथे रॉका युवक च्या वतीने दिपावली स्नेहमिलन संपन्न

तळणी (रवी पाटील)मंठा तालुक्यातील तळणी येथे दीपावली स्नेहमिलनाचे आयोजन  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष्य ज्ञानेश्वर माऊली सरकटे याच्या वतीने करण्यात आले होते या स्नेह मिलनात सर्वपक्षीय आजी माजी कार्यकर्त उपस्थीत होते तळणी मध्ये पहिल्यादांच दिवाळी स्नेह मिलन होत असल्याने येणाऱ्या जि प प समितीची पूर्व तयारी म्हणायला हरकत नाही  सघटनात्मक पकड व कार्यकर्त्यचा उत्साह व सपर्क वाढवण्यासाठी याचा उपयोग होत असतो तळणी मध्ये पहिल्यादांच या स्नेहमिलनाचे आयोजन होत असल्याने सर्वपक्षीय नेत्यानी उपस्थीती लावली यामध्ये राजेश राठोड सुरेश जेथलीया कपील आकात भाऊसाहेब काका गोरे लोणार शिवसेना ता अध्यक्ष्य बळीराम मापारी संतोष वरकड युवा उद्योजक शरद पाटील नितीन सरकटे तळणी  सरपंच ऊध्दवराव पवार ज्ञानेश्वर सरकटे  बबनराव गणगे सचिन बोराडे डिगांबर ईक्कर  वैजनाथ बोराडे विष्णूपंत मोरे बाबुसिग महाराज प्रमेश्वर मोरे भगवान देशमूख बालासाहेब मोरे दारासीगं चव्हाण गौतम सदावर्त  आदीची उपस्थीती या स्नेह मिलनासाठी होते 

राजकीय टीका टीपणी च्या पलीकडे जाऊन राजकी पुढारी सुध्दा एकञ येऊ शकतात राजकाराणा मधील मीञता ही स्वच्छ मनाने केलेली असतात प्रत्येक राजकीय पुढाऱ्याने ग्रामीण भागामध्ये  स्नेहमिलनाच्या कार्यकर्माचे आयोजन करून एक स्वच्छ राजकीय विचाराचे  राजकीय व्यासपीठ उपलब्ध करावे ज्यामधून नवयुवकाना आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल ती संधी माऊली मिळाली असल्याने ग्रामीण भागातुन असे नवतरून नेतूत्व पूढे येते असल्याचे प्रतिपादन लोणार शिवसेना ता अध्यक्ष्य बळीराम मापारी यानी व्यक्त केले 

 राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये युवकांना मोठी संधी असुन ग्रामीण भागातून सुध्दा नेतृत्व करणारे तरून पूढे येत आहे ग्रामीण सुध्दा स्नेह मिलनाचे आयोजन करून सर्वाना एकाच व्यासपीठावर एकत्र  आणने म्हणजेच नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे सिध्द होते असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष्य भाऊसाहेब काका गोरे यानी व्यक्त केले यावेळी सुरेश कुमार जेथलीया . कपिल आकात उध्दवराव पवार बालासाहेब मोरे आदीनी आपले मनोगत व्यक्त केले युवा नेते ज्ञानेश्वर माऊली सरकटे यांनी आभार व्यक्त केले व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगांता झाली

Comments