परतूरात महावितरचा कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित करून भाजपा युवामोर्चाचे ठिय्या ,आंदोलन बबनराव लोणीकर यांच्या भ्रमणध्वनी नंतर श्रीष्टी सर्कलसह परतूर तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत



परतूर(प्रतीनीधी) थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी सरसकट शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा पवित्रा महावितरणने घेतल्यानंतर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची बाजू घेत भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने शुक्रवारी दुपारी १२ वाजता परतूर शहरातील  महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. महावितरण कार्यालयातील विद्युत पुरवठा खंडित करून सहायक अभियंत्याच्या दालनात तब्बल २ दोन ठिय्या देत जोरदार घोषणा घोषणाबाजी केली. माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर आणि भाजपा युवामोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे कडक पवित्रा घेता आक्रमक आंदोलन करण्यात आले.  जो पर्यंत खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरु केला जात नाही, तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला होता.ठिय्या आंदोलन मध्ये सहभागी यावेळी भाजपा तालुका रमेश भापकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे युवामोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संपत टकले,रमेश आढाव,नितीन जोगदंड, शिवाजी पाईकराव,वसंत बेरगुडे, रयत क्रांतीचे गजानन राजबिंडे,संभाजी खवल, धोंडीराम नवल,  राजेश ढवळे, संभाजी शिंदे,सदाशिव खवल,शिव संग्रमचे सचिन खरात,सूर्यभान कदम विष्णु मचाले, शुभम कठोरे, कैलास खालापुरे,करण गोरे,किसनराव आघाव, सुरेश भूंबर, पांडुरंग बरकुले, आसाराम नवल  आदींची उपस्थिती होती.
सुरुवातीला महावितरण कार्यालयासमोर ठिय्या दिलेल्या आंदोलकांनी काही वेळाने अक्रमक पवित्रा घेत उपकार्यकारी अभियंत्यांचे दालन गाठले. दालनाचा ताबा घेत अधिकाऱ्यांना घेराव घातला. युवामोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी कार्यालयातील विद्युत पुरवठा बंद करून आतील ट्यूबलाईट,पंखे  काढून घेतल्या गेले. आंदोल आक्रमक झाल्याचे लक्षात येताच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, सहायक पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केले.

*वीजबिलासाठी महावितरण शेतकऱ्यांना कुठल्याही नोटीसा न देता मनमानीपणे वीजपुरवठा बंद करते. हीच तत्परता एखादा ट्रान्सफार्मर बंद बदल्यावर का दाखवत नाही. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे दरवर्षी शोर्ट सर्किट मुळे अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून मोठे आर्थिक नुकसान त्यांना सहन करावे लागते. यापुढे शोर्टसर्किट मुळे ऊस जळाला तर संबंधित शेतकऱ्याला महावितरणने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी केली*.
 रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे काम सुरु असतांना, महावितरणची ही हुकुमशाही शेतकरी सहन करून घेणार नाही. मंत्र्यांच्या मतदार संघात कमी पैसे भरून घेत वीज पुरवठा सुरु केला, मग आमच्यावर हा अन्याय का ? असा सवाल उपस्थित करत  कणसे यांनी  महावितरण अभियंत्यांना धारेवर धरले. 

 लोणीकरांची मध्यस्थी : माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर व राहुल भैय्या लोणीकर यांनी भ्रमणध्वनीवरून उपकार्यकारी अभियंता एन.व्ही.बेंडाळे यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा अधिकार महावितरणला नाही. महावितरणने अशी अडेल भूमिका घेतली तर जशास तसे उत्तर देऊ असे सांगत  वीजपुरवठा पूर्ववत सुरु करण्याबाबत आदेशित केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती