ई श्रम कार्डच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार विविध सरकारी योजनेचा लाभ-अविनाश राठोड
सरकारला "ई श्रम कार्ड" द्वारे ओबीसी  चा डाटाबेस तयार  करता येईल., तो डाटाबेस सर्वोच्च न्यायालयात दाखल करून पुन्नच आरक्षण टिकू शकेल... अविनाश राठोड


मंठा(सूभाष वायाळ) तालूक्यातील नायगाव ग्रामपंचायत आणि केंद्र सरकार च्या कॉमन सर्विस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने "ई श्रम कार्ड" काढण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.हे उपक्रम पुढील तीन दिवस चालणार असून या शिबिराच्या माद्यमातून कॉमन सर्विस सेंटर चे ऑपरेटर एकनाथ जाधव, आकाश आढे आणि आकाश राठोड यांनी 16 ते 59 वयातील  अनेक नागरिकांचे "ई श्रम" कार्ड काढून तें पोर्टल वर रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे.नागरिकांना या माद्यमातून 12 अंकी UAN नंबर मिळणार असून या मुळे गरीब लोकांचा डेटा बेस सरकार कडे जामा होणार आहें.या योजनेच्या माध्यमातून शेतकरी,घरेलू नैकर ,आशा वर्कर, वाहनचालक इतर कामगारांना विविध सरकारी योजनेचा लाभ होणार असल्याचे अविनाश राठोड यांनी सांगितले. त्या मध्ये प्रधानमंत्री श्रम  मानधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना, इतर योजनेचा लाभ होणार आहे. पुढे त्यांनी ज्या नागरिकांनी श्रम कार्ड काढलेले आहे त्या व्यक्तीची दुर्घटना झाल्यास त्याच्या वारसाला दोन लाख रुपयाचा दुर्घटना विमा दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे 60 वय झाल्यास लाभार्थ्याला तीन हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे. दुर्घटनेमध्ये अपंगत्व आल्यास एक लाख रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळणार असून हे कार्ड संपूर्ण देशात चालणार असल्याचे राठोड यांनी शेवटी सांगितले.          या कार्यक्रमाला सरपंच गजानन फुपाटे ग्रामसेवक बाबासाहेब गवळी रघुनाथ कोकाटे. इतर गावकरी उपस्थित होते.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर तालूका ग्रामपंचायत आरक्षण सोडत