दैठणा बु व हरेरामनगर येथील शालेय व्यवस्थापन समित्या ची परंपरा कायम दोन्ही समित्या बिनविरोध






       परतुर(हनूमंत दंवडे) तालुक्यात शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीमध्ये राजकारण केल्या जात असुन शिक्षण क्षेत्रातही कुरघोडी भांडणांचा बाजार मांडला आहे.पण याला दैठणा बु व हरेराम नगर अपवाद ठरला आहे.तालुक्यात दैठणा गावाची परंपरा आहे  शालेय व्यवस्थापन समितीची निवड सर्वानुमते बिनविरोध  करण्यात आली.
यात अध्यक्ष म्हणून श्री विठ्ठल नरवडे तर उपाध्यक्ष म्हणून श्री अशोक मुकादम यांची निर्विरोध निवड झाली.
 तसेच पालक सदस्य म्हणून सौ मीरा तात्याराव गायके, द्रोपदा गुलाबराव कवडे, श्री कैलास मखमले, सौ शोभा गजानन वखरे, सौ गंगासागर अर्जुन सोनगुडे, श्री हनुमान थोरे, श्री लक्ष्मण मोरे, सौ नीता विठ्ठल घोडे यांची तर, शिक्षण प्रेमी म्हणून श्री अशोक गुलाबराव बेरगुडे यांची निवड करण्यात आली. स्थानिक प्राधिकरण सदस्य म्हणून सौ संगीता शामराव चव्हाण यांचे नामनिर्देशन करण्यात आले. सदर निवडीवेळी खेळीमेळीच्या वातावरणात व बिनविरोध सर्व निवड पार पडली. याप्रसंगी सरपंच मा.श्री. शत्रुघ्न भैय्या कणसे यांनी नवीन समितीस शुभेच्छा देताना शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी समितीस सहकार्य करण्यासाठी मी सदैव असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक श्री एम वी काळे यांनी कामकाज पाहिले.
जिल्हा परिषद प्राथ.शाळा हरेरामनगर येथे शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. नियोजनाप्रमाणे पालक सभेस उपस्थित पालकांमधून बिनविरोध सर्व सदस्यांची निवड करण्यात आली. निवडून आलेल्या सदस्यांमधून सर्वानुमते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड झाली. यावेळी सरपंच शत्रुघ्न कणसे वसंतराव बेरगुडे शामराव चव्हाण आसाराम रेपे अशोक बेरगुडे परमेश्वर रेपे पुंजाराम कणसे आसाराम उनवणे गुलाब कवडे, श्रीराम मोरे आदी  उपस्थित होते  खेळीमेळीच्या वातावरणात निवडप्रक्रिया पार पडली. 

प्रशाला हरे राम नगर येथील
 नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्यांची नावे खालील प्रमाणे...
1) श्री ज्ञानेश्वर पंडितराव सोलंके (अध्यक्ष)
2) श्री सुशील लिम्बाजी कणसे(उपाध्यक्ष)
3)श्रीम.लता विठ्ठल कणसे (सदस्य)
4)श्रीम.अर्चना ज्ञानदेव कणसे(सदस्य)
5)श्रीम.मुक्ता  निवृत्ती कणसे (सदस्य)
6)श्री विठ्ठल अण्णासाहेब घोड़े(सदस्य)
7)श्री भरत श्रीराम कणसे(सदस्य)
8)श्री ज्ञानेश्वर प्रल्हादराव कणसे (शिक्षणतज्ञ)
9)श्री गौतम काळूबा भदरगे( ग्रा.सदस्य)
 सर्व नवनियुक्तांचा शाळेच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या निवड प्रक्रियेत श्री शत्रुघ्न सदाशिवराव कणसे (सरपंच), श्री आसारामजी नवल उद्धव कणसे, ज्ञानेश्वर कणसे गोविंद सोळंके काळुबा भदर्गे भरत कणसे किसन मखमले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मुख्याध्यापक श्री पवार एम. पी. (मु.अ.)श्रीमती अंभुरे एस. के.(स. शि.)व पालक उपस्थित होते.
        
शाळा हे ज्ञान मंदिर आहे त्याचे पावित्र्य राखले पाहिजे जि.प शाळा ही जीवन घडवणारे ठिकाण आहे त्यामध्ये वादविवाद व राजकारण करून शाळेचा खराब करू नका शाळेच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणार 
*शत्रुघ्न कणसे पाटील* 
जिल्हा अध्यक्ष सरपंच परिषद जालना

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती