विटा महाग, लाभार्थ्याचे बजेट कोलमडले.


परतूर (हनूमंत दवंडे)
परतूर तालुक्यात घरकुल योजने अंतर्गत अनेक घराचे बांधकाम सुरु आहे.आधीच बांधकामाकरिता वापरात येत असलेल्या विविध साहित्याच्या दरात भरमसाठ वाढ झाली असतानाच आता वीट भट्टी मालकांनी ही विटाचे दर वाढविल्याने ही दरवाढ घरकुल लाभार्थ्याचे बजेट बिघडवणारी ठरत आहे .शासनाच्या पंतप्रधान घरकुल योजना ,शबरी घरकुल योजना ,रमाई घरकुल योजना, समाज कल्याण विभाग घरकुल योजने अंतर्गत परतूर तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना विशिष्ट मर्यादित घरकुल बांधकाम करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. मात्र घरकुल बांधकामाकरिता वापरात येणाऱ्या साहित्यात दरवाढ झाली असल्याने लाभार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये रेती, लोहा, सिमेंट ,मुरूम ,विटा ,आधी साहित्याचा समावेश आहे. विटा ची मागणी वाढ ली याचा फायदा घेत विटा भट्टी मालकाची मनमर्जी चालू  झाली आहे .वीटभट्टी मालक प्रति ट्रॅक्टर नऊ हजार रुपये दर आकारीत असल्याने लाभार्थ्यांना घरकुल कामात अडचणी येत आहेत..

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण