मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांची वाहनधारकांवर कारवाई


 मंठा -- (सुभाष वायाळ)दि. 4 मंठा शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर शहरातील पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी कारवाई केली. यामध्ये वशिष्ठ बळीराम बोराडे राहणार आंबोडा कदम,अशोक भारतराव थोरात  राहणार नांदगाव,शिवाजी बंसी पवार राहणार गारटेकी, विकास भगवान ईघारे राहणार कीर्तापूर, आदिनाथ संभाजी जाधव राहणार तळतोंडी ही सर्व वाहने वाहनधारकांनी बेशिस्तपणे मुख्य रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलिसांनी वरील सर्व वाहनधारकांवर कारवाई केली आहे. वरील कारवाई पोलिस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे, प्रशांत काळे,विलास कातकडे, दिपक आढे, सुनील ईगल, दिपक ढवळे, वसंत राठोड यांनी केली. या कारवाईमुळे शहरातील अवैध वाहतूक व बेसिस्त वाहन धारक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण