रायपूर येथे ओबीसीची बैठक संपन्न..======


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
परतुर: दिनांक 5 जानेवारी 2022रोजी हनुमान मंदिर रायपूर येथे ओबीसी समाजाची बैठक पार पडली. दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी वाटुर तालुका परतुर येथे होणाऱ्या रास्ता रोको  आंदोलनासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली .ओबीसी आरक्षण हा केंद्र आणि राज्य सरकारचा डावआहे ,ओबीसींचे राजकीय आरक्षण का गरजेचे आहे? यावर शिवाजीराव तरवटे साहेब यांनी आपले विचार मांडले  तर भारत हा पूर्वीपासून खेड्यांचा देश असून या खेड्यात सुद्धा बारा बलुते दार आणि अठरा आलुते दार पद्धती होती असे राम प्रसाद थोरात सर यांनी सांगितले. ओ.बी.सी. आरक्षण सरकारने हिसकावून घेऊ नये यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्रित येऊन एल्गार करावा असे आवाहन अशोक राव आघाव साहेब यांनी केले. आता राजकीय आरक्षण काढले आता शैक्षणिक आरक्षण काढतील यावर प्रवीण काका सातोनकर साहेब यांनी आपले मत मांडले या बैठकीसाठी परतूर पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद जी थोरात सर माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक रावजी आघावसाहेब नगर परिषद परतूर चे नगरसेवक प्रवीण काका सातोनकर रासपचे शिवाजीराव तरवटे साहेब आणि पत्रकार मित्र दवंडे साहेब, खांडवी येथील प्रथम नागरिक तथा सरपंच गणेश रावजी हरकळ साहेब, खांडवी येथील उत्तमराव वाघमारे रायपूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,माजी सरपंच तसेच ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कुकडे सर यांनी केले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण