जि.प.शाळा हेलस येथे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटपमंठा(सुभाष वायाळ )तालुक्यातील जि.प.उच्च प्रा.शा. हेलस येथे सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश देण्यात आला.आताच शालेय व्यवस्थापन समितीची निवड झाली असून त्यामध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित अध्यक्ष सौं, सुरेखा राजेभाऊ खराबे उपाध्यक्ष श्री दिपक दत्ताराव खराबे व सर्व शालेय समितीचे सदस्य यांच्या शुभहस्ते गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात आले यासाठी जि. प. उच्च प्राथमिक शाळा हेलस च्या सर्व शिक्षकवृंदांनी चांगले कार्य केल्याबद्दल गावकऱ्यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष कैलास खराबेपाटील, शालेय समितीचे माजी अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर ( माऊली )खराबे पाटील ,पत्रकार बाळासाहेब खराबे पाटील, राजेभाऊ खराबे पाटील, उबेद पटेल व सर्व विद्यार्थी, शिक्षक, गावकरी उपस्थित होते.

  
प्रतिक्रिया
आज शाळेतील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जातो. विविध शैक्षणिक,सांस्कृतिक,गुणवत्ता विकासावर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविले जातात. हे सर्व नवनवीन उपक्रम शाळेत आयोजित करण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी पालक, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक यांचा सहभाग असतो विविध उपक्रमांना विशेष सहकार्य शालेय व्यवस्थापन समिती करते, सर्वांच्या समन्वयामुळे आज शाळेत सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आहे शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरल्या जावी. रिक्त पदांचे ग्रहण सुटता सुटेना शालेय व्यवस्थापन समिती वेळोवेळी सहकार्य करते त्यांचे मनापासून आभार मानतो पुढील काळात सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो.
 आर.बी.कुडे
 मुख्यध्यापक :-जि.प.उच्च प्राथमिक शाळा हेलस ता.मंठा जि.जालना

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि