लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

जि.प.शाळा हेलस येथे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप



मंठा(सुभाष वायाळ )तालुक्यातील जि.प.उच्च प्रा.शा. हेलस येथे सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश देण्यात आला.आताच शालेय व्यवस्थापन समितीची निवड झाली असून त्यामध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित अध्यक्ष सौं, सुरेखा राजेभाऊ खराबे उपाध्यक्ष श्री दिपक दत्ताराव खराबे व सर्व शालेय समितीचे सदस्य यांच्या शुभहस्ते गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात आले यासाठी जि. प. उच्च प्राथमिक शाळा हेलस च्या सर्व शिक्षकवृंदांनी चांगले कार्य केल्याबद्दल गावकऱ्यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष कैलास खराबेपाटील, शालेय समितीचे माजी अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर ( माऊली )खराबे पाटील ,पत्रकार बाळासाहेब खराबे पाटील, राजेभाऊ खराबे पाटील, उबेद पटेल व सर्व विद्यार्थी, शिक्षक, गावकरी उपस्थित होते.

  
प्रतिक्रिया
आज शाळेतील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जातो. विविध शैक्षणिक,सांस्कृतिक,गुणवत्ता विकासावर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविले जातात. हे सर्व नवनवीन उपक्रम शाळेत आयोजित करण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी पालक, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक यांचा सहभाग असतो विविध उपक्रमांना विशेष सहकार्य शालेय व्यवस्थापन समिती करते, सर्वांच्या समन्वयामुळे आज शाळेत सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली आहे शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरल्या जावी. रिक्त पदांचे ग्रहण सुटता सुटेना शालेय व्यवस्थापन समिती वेळोवेळी सहकार्य करते त्यांचे मनापासून आभार मानतो पुढील काळात सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो.
 आर.बी.कुडे
 मुख्यध्यापक :-जि.प.उच्च प्राथमिक शाळा हेलस ता.मंठा जि.जालना

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत