छत्रपती संभाजी राजे यांच्या अमरण उपोषणाला मंठा मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा


 मंठा प्रतिनिधी सुभाष वायळ /पप्पू घनवट 
दि.२८ मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने अनेक जणांनी वेळोवेळी मागण्या केलेल्या आहेत. तरीसुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसून हा प्रश्न सतत प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये विविध मराठा सामाजिक संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे.
       आता यासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी आझाद मैदान मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच समाजाच्या इतर प्रलंबित मागण्या सुद्धा पूर्ण व्हाव्यात यासाठी अमरण उपोषण सुरू केले आहे. या आमरण उपोषणाला महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्य व तेथील जनतादेखील पाठिंबा दर्शवित आहे. या आमरण उपोषणाला मंठा तालुक्यातील मराठा समाजाच्या विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.या पाठिंब्याची निवेदन मंठा तहसीलदार व मंठा पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ,शिवाजीराव जाधव, एकनाथराव काकडे, शिवाजीराव देशमुख, वैजनाथराव मोरे दिगंबर बोराडे, कुलदीप बोराडे, सचिन बोराडे, शत्रुघन तळेकर, शरद बाहेकर, आदि जणाच्या स्वाक्षर्‍या आहेत व या वेळी आदी जण उपस्थित होते.

 चौकट
 छत्रपती संभाजी राजे यांच्या आमरण उपोषणाची शासनाने वेळीच दखल घेतली नाही व मराठा समाजाला आरक्षण देण्यास विलंब केल्यास मराठा सेवा संघाच्या नेतृत्वाखाली मंठा येथे उपोषण करण्यात येणार आहे. तरी शासनाने याची वेळीच दखल घ्यावी. व समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात.
- ता.अध्यक्ष मराठा सेवा संघ
 ज्ञानेश्वर वायाळ

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात