सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

प्रहार संघटनेकडून महाशिवरात्री निमित्त फळे वाटप

 _______________________
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
 परतूर  येथे प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग संघटनेच्या वतीने परतूर येथील हेमांड पंथी मंदिर  इसवी .सन 16/ 24 चे पुरातन महादेव मंदिर व ग्रामीण रुग्णालय परतुर या ठिकाणी प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुका उपाध्यक्ष आत्माराम जगताप यांच्या वतीने फळे वाटप करण्यात आली .
           यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. सिद्दिकी साहेब प्रमुख उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी बप्पा सवणे तसेच जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना अशोक तनपुरे व हनुमान  माने माजी जिल्हाध्यक्ष प्रहार अपंग संघटना व प्रहार सेवक शंकर लिंगसे ,रमेश सुरवसे ,प्रकाश तनपुरे ,पत्रकार आढाव ,व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांना फळे वाटप करण्यात आली व सर्वांनी फळाचा आनंद घेतला.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत