गीता हा अमृत ग्रंथ आहे गीता ही मार्गदर्शक आहे गीता ही योग शास्ञ आहे -आनंद चैतन्य महाराज

तळणी : (रवि पाटील ) तळणी येथून जवळच असलेल्या दहिफळ खंदारे येथे चालू असलेल्या श्री गीता रामायण सत्सगांचा आजचा दुसरा दीवस या सत्संगाचे आयोजन योगीधाम येथील योगानंद बापू याच्या मार्गदर्शनाखाली या तीन दीवशीय संत्संगाचे आयोजन करण्यात आले राष्ट्रीय संत प पु लक्ष्मण चैतन्यजी महाराज यांचे शिष्य श्री आंनद चैतन्य महाराज यांच्या सुमधूर वाणीतून या सत्संगाचा लाभ पंचक्रोशीतील हजारो नागरिक घेत आहे 

गीता हा अमृत ग्रंथ आहे गीता ही मार्गदर्शक आहे गीता ही योग शास्ञ आहे तर रामचारीत मानस हे प्रयोग शास्ञ आहे त्याचे अनुकरण करणे हे मानव जातीच्या हिताचे आहे पाच हजार वर्षापासूनच्या आधी पासून गीता ही धर्माचा आधार बनली आहे आज ही लाखो साधक गीतेचा आधार घेऊन जीवन सार्थकी करत आहे तीच गीता कुरूक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जूनाला सांगून उपदेश केला होता त्याच गीतेचा आधार हा धर्माच्या बाजूने होता ही वस्तूस्थीती गीतेच्या माध्यमाध्यमातून अर्जुनाला भंगवताने सागीतल्या नंतरच अर्जुनाने शस्त्र हाती घेऊन हे धर्मयुद्ध .पांडवाने
जिंकले

सत्संग हा मानव जातीच्या उद्धाराचा आधार आहे यामध्ये प्रत्येकाने नाचले पाहीजी ही सुष्ट्री त्याच भंगवताच्या कृपेवर चालू आहे ज्या भगवताने ही सुष्ट्री बनवली त्याची फक्त आठवण जरी रोज काढली तरी मानवाचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक ठिकाणी त्याचा सहवास आहे तो जाणवायचा असेल तर सत्संगाचा मार्ग स्वीकारा तो तुम्हाला जाणवल्या शिवाय राहणार नाही ज्या भगंवतांन ही सुंदर सुष्टी तयार केली तो कीती सुंदर असेल त्याने तयार केलेल्या प्रकृती जर आपण ञास दीला तर तो आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही सत्संगासाठी वयाची मर्यादी नसते प्रत्येकाने तो स्वीकारण्याची गरज आहे जो श्रध्दावान असतो तो ज्ञानीच असतो जी श्रध्दा अर्जुनाची कृष्णावर होती म्हणून त्या श्रध्देचे फळ अर्जुनाला मिळाले म्हणून तर भगवतांने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले 
गुरू हे व्यक्तीत्व आहे गुरुचा आदर असलाच पाहीजे आपले आचरणच आपल्या गुरुचे श्रष्ठत्व सिध्द करत असते 
गुरु शिष्याचे नाते हे बलवान असले पाहीजे ज्याचे गुरु बलवान असतात त्याचे शिष्य सुध्दा बलवान असले पाहीजे जो शीष्य त्या योग्यतेचा नसेल तर त्याने बाजुला झाल पाहीजे त्याची श्रध्दा कुठे तरी कमी पडते भक्ती केल्यावर त्याची कृपा होतीच जर भक्ती करून तो जाणवला नाही तर ती भक्ती पांखडी समजावी हे जगदगूरू तुकाराम महाराजांनी सांगितले आहे भक्ती करत असताना ती निस्वार्थ असली पाहीजे तीच भगवतांला प्रिय असते 


मांसाहार हा मानवी जीवनास हानीकारच आह द्वारपार युगात त्र्यतायुगात व एकोणा वीसशतकाच्या नंतर मांसांहाराचे प्रमाणात वाढ झाली ती मांसाहारी वृतीच मनुष्याची झाली आहे कोरोना काळात त्याचे प्रमाण विनाकारणचे वाढले


शुध्दीवर असलेला मनुष्य कधीच मदीरेचे सेवन करत नाही पंरतू समाजात अशा काही चूकीच्या प्रथा पडत आहे की कुठल्या चागल्या कार्याला मदीरा पिण्याची प्रथा पडत आहे ती कधीच समाज मान्य गोष्ट नाही संत सेवालाल महाराजांनी या गोष्टीचा त्याच्या काळात सुध्दा त्यानी या गोष्टी समाजामध्ये जनजागृती केली होती त्यानी घालून दिलेल्या मार्गावर आज चालणे गरजेचे आहे कारण संतच खर सागू शकतात कारण ते अधिकार प्राप्त असतात 
संत झानेश्वर संत तुकाराम संत नामदेव याचा मोठा सघर्ष हा समाजाच्या धर्माच्या उथ्यानासाठीच होता त्याचा अभिमान प्रत्येकाने ठेवला पाहीजे 

मनुष्याच्या जीवनासाठी काय प्रातिकूल आहे काय अनुकूल आहे हे समजले पाहीजे संसारीक आयुष्यात गरजेपूर त्या गोष्टीच असल्या पाहीजे रावणा कडे कुठल्याच गोष्टीच कमतरता नव्हती पंरतू नीयत भष्ट्र झाल्याने सोन्याच्या लंकेचे सुध्दा दहन झाले सध्याच्या काळात कौटू बीक एकता गरजेची आहे घरातील वडीलधार्याचा मान सन्मान ठेवला पाहीजे तर घरातील तरुणांनी आज्ञेत राहुन घरात समन्वय ठेवण्याचे काम केले पाहीजे तरच कौटूबीक कलह टळल्याशिवाय राहणार नाही आपली भारतीय संस्कृती ही *वसदेव कुटूबंक म* ची आहे तीचा आदर करा तरच ती टिकेल आई वडीलांचा सन्मान ठेवा तेच आपले खरे दैवत आहेत निर्बल मनुष्याला ञास देऊ नये कारण त्याचा शाप आपल्या सुखाचा अडसर ठरत असतो आपले कर्मच आपले पूण्य पाप ठरवत असते आपण दुसऱ्याच्या वाटेत काटे टाकले तर आपल्याला कांलांतराने त्याचा हिशोब द्यावाच लागतो त्यासाठी चांगल्या कर्माचा संचय मनुष्य जीवनात असणे गरजेचे असल्याचे श्री आनद चैतन्य महाराज यानी सांगीतले 

या सत्संगाच्या वेळी योगधाम दही फळचे योगांनंद बापू श्री दत्त सस्थान भोलेनाथ गडाचे चरणदास महाराज चैतन्य महाराज विठ्ठल महाराज व मोठया संख्येने पंचक्रोशीतील भावीकाची उपस्थीती होती उद्या या ज्ञानयज्ञाची सांगता होणार आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती