राज्यातील दोन लाखावर नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी दोन मे 22 पासून करणार बेमुदत काम बंद आंदोलन ....प्रलंबित मागण्याबाबत प्रदीर्घ काळापासून सरकार तोडगा काढत नसल्याने घेतला आंदोलनाचा पवित्रा......प्रतिनिधी हनुमंत दवांडे
 महाराष्ट्रातील 400 पेक्षा जास्त नगरपालिका व नगरपंचायतीचे दोन लाखापेक्षा जास्त कर्मचारी 2 मे 22 पासून महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे.

 महाराष्ट्र सरकार या कर्मचाऱ्यांच्या मागण्या कडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने व नगर विकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ऑनलाइन बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय कायम केला आहे...

 2 सप्टेंबर 2021 रोजी नगरपालिका प्रशासन मुंबई यांच्याबरोबरच प्रदीर्घ बैठक होऊन त्याबाबत आश्वासने दिली मात्र ठोस कारवाई केली नाही. 

दरम्यानच्या काळात संघर्ष समितीने वेळोवेळी नगरपालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व नगरविकास मंत्र्यांकडे या मागण्यांबाबत पाठपुरावा केला परंतु मागण्यांबाबत ठोस निर्णय झालेला नाही.

 राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला शंभर टक्के वेतन कोषागार मार्फत मिळावे, राज्य सरकारने सहाय्यक वेतन अनुदान ऐवजी वेतन अनुदान मंजूर करावे ,दहा- वीस -तीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची तीन हप्ते मिळावेत, नव्याने झालेल्या नगरपंचायत येथील सफाई कामगारांसह सर्व कर्मचाऱ्यांना विनाशर्त विनाअट समावेशन करावे, सर्व नवीन नगरपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांची आकृतिबंध यामध्ये पद निर्मिती करावी ,सेवेत असताना मयत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने किंवा अनुकंपा योजनेअंतर्गत नियुक्ती द्यावी, नगर परिषदेचे थकित सहाय्यक अनुदानाची रक्कम त्वरित मिळावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची कायदेशीर देणी एकरकमी द्यावीत तसेच दरमहा निवृत्ती वेतन एक तारखेला द्यावे, हंगामी व ठेकेदार कर्मचाऱ्यांना समान कामाला समान वेतन या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे वेतन मिळावे तसेच सर्व कायदेशीर लाभ मिळावेत या मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे .

या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व 400 नगरपालिका नगरपंचायती मधील 2 लाखावर कर्मचारी सहभागी होणार असून मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत दोन मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीने केला आहे.
डॉक्टर डी एल कराड.,अँड सुरेश ठाकूर.,डी पी शिंदे.,रामगोपाल मिश्रा.,सुनिल वाळुंजकर.,संतोष पवार
.पोपटराव सोनवणे.,रामदास पगारे आदि माहिती दिली

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि