शेतकऱ्यांच्या गुणवंत मुलींचा सत्कार संम्पन

परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
बळीराजा करिअर अकॅडमी,खरपुडी जि. जालना या संस्थेच्या वतीने ई. 11 व 12 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत निवासी कोचिंग क्लास घेण्यात येणार आहेत. यामध्ये NEET, JEE, MHCET या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी या संस्थेने जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेतली होती. 
           या कठीण असलेल्या परीक्षेत आनंद माध्यमिक विद्यालय परतूर च्या विद्यार्थिनी झाशी राजेभाऊ जगताप , श्रावणी राजकुमार तांगडे , पूजा भारत मंडपे या उत्तीर्ण झाल्या. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक प्रशांत वेडेकर , अनुसया गारकर , विक्रम भांडवलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थान राजकुमार तांगडे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेभाऊ जगताप , एकनाथ कदम उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात राजकुमार तांगडे म्हणाले की, मुलीच्या यशस्वीते बद्दल आई-वडिलांचा सत्कार होणे याचे मोल होऊ शकत नाही.या यशाचे श्रेय शिक्षक व मुलींचे आहे. यामुळे शाळेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संजय कदम यांनी केले.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान