परतूर येथील उपविभागीय कृषी कार्यालयामार्फत शेतकरी प्रशिक्षण दौरा रवाना
परतूर – प्रतिनिधी हनुमंत दवंडे
येथील उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकर्यांना संशोधन केंद्रांना भेटी देऊन प्रशिक्षण देण्यासाठी दौ-र्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि ६ एप्रिल २०२२ रोजी प्रकल्प सहाय्यक एस एस वैद्य यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शेतकरी प्रशिक्षण दौरा रवाना करण्यात आला.
उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय येथून उपविभागीय कृषी अधिकारी गजानन सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परतूर,अंबड, घनसांगी, मंठा तालुक्यातील शेतकरी यांना राहुरी, तळेगाव, दाभाडी, राजगुरू, माजरी, बारामती इत्यादी कृषी विद्यापीठ भेटी तसेच फल उत्पादन तंत्रज्ञान कांदा लसुन संशोधन केंद्र, शुगर संशोधन केंद्र, कृषी विभागाच्या विविध योजना विषयी माहिती व प्रशिक्षण घेण्यासाठी पाच दिवसाचा दौराचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी दौरा प्रसंगी सोबत कृषी सहाय्यक स्वप्नील घोडके, आर.व्ही कारले हे दौर्यात सहभागी झाले आहेत.
*फोटो ओळी परतूर येथील शेतकरी प्रशिक्षण दौरा हिरवा झेंडा दाखवून रवाना करतांना प्रकल्प सहाय्यक एस एस वैद्य, कृषी सहाय्यक प्रल्हाद विजापुरे, स्वप्नील घोडके, आर. व्ही कारले आदि शेतकरी दिसत आहेत*
Comments
Post a Comment