सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर येथील उपविभागीय कृषी कार्यालयामार्फत शेतकरी प्रशिक्षण दौरा रवाना

परतूर – प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
येथील उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकर्‍यांना संशोधन केंद्रांना भेटी देऊन प्रशिक्षण देण्यासाठी दौ-र्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि ६ एप्रिल २०२२ रोजी प्रकल्प सहाय्यक एस एस वैद्य यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शेतकरी प्रशिक्षण दौरा रवाना करण्यात आला.
   
उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय येथून उपविभागीय कृषी अधिकारी गजानन सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परतूर,अंबड, घनसांगी, मंठा तालुक्यातील शेतकरी यांना राहुरी, तळेगाव, दाभाडी, राजगुरू, माजरी, बारामती इत्यादी कृषी विद्यापीठ भेटी तसेच फल उत्पादन तंत्रज्ञान कांदा लसुन संशोधन केंद्र, शुगर संशोधन केंद्र, कृषी विभागाच्या विविध योजना विषयी माहिती व प्रशिक्षण घेण्यासाठी पाच दिवसाचा दौराचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी दौरा प्रसंगी सोबत कृषी  सहाय्यक स्वप्नील घोडके, आर.व्ही कारले हे दौर्‍यात सहभागी झाले आहेत.
 
*फोटो ओळी परतूर येथील शेतकरी प्रशिक्षण दौरा हिरवा झेंडा दाखवून रवाना करतांना प्रकल्प सहाय्यक एस एस वैद्य, कृषी  सहाय्यक प्रल्हाद विजापुरे, स्वप्नील घोडके, आर. व्ही कारले आदि शेतकरी दिसत आहेत*

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत