दैनंदिन जीवनाशी गणिताचा संबंध जोडल्यास गणित विषय सोपा- डॉ. प्रज्ञानकुमार भोजनकर ,आनंद विद्यालयात संपन्न झाली गणित विषयाची कार्यशाळा


प्रतिनिधी / परतूर हनुमंत दवंडे :
        दैनंदिन जीवनात सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत अनेक घटनांच्या माध्यमातून गणिताचा संबंध आलेला आपल्याला पाहायला मिळते.गाणितातील आकडेमोडीची भीती मनात न बाळगता, गणिताशी बोला, त्याच्याशी मैत्री करा, गणित तुम्हाला आपलेले करील असे मत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे सदस्य डॉ. प्रज्ञानकुमार भोजनकर यांनी व्यक्त केले आहे. येथील आनंद माध्यमिक विद्यालयात गणित विषयासंदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. गणित विषयाची विद्यार्थ्याना वाटणारी भीती आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. भोजनकर बोलत होते. यावेळी शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष एकनाथ कदम, मुख्याध्यापिका सत्याशिला तौर-कदम यांची प्रमुख उपस्थिती होती गणित विषय विद्यार्थ्यांच्या विचारशक्तिला चालना देणारा, बौद्धिक विकासाला प्रोत्साहन देणारा विषय आहे. गणितात अनेक गमतीशीर बाबी समजून घेतल्यास विषय कंटाळवाणा न होता गमतीशीर होऊ शकतो. गणितातबाबतचा न्यूनगंड बाजूला ठेवून नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी गणिताचे अध्ययन केल्यास हा विषय समजण्यास सोपा होईल. शिक्षकांनी देखील गणिताचे अध्यापन करतांना विविध अध्यापन पद्धतींचा अवलंब करून गणिता बद्दल विद्यार्थ्याच्या मनात आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.जागतिक स्तरावर गणित विषयावर होणारी विविध संशोधने, प्रसिद्ध होणारे शोधप्रबंध या बाबत गणित शिक्षकाने सजग असले पाहिजे असे पुढे बोलतांना डॉ. भोजनकर म्हणाले. विविध गणिती क्रिया करतांना वापरण्यात येणाऱ्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके यावेळी त्यांनी विद्यार्थ्याना करून दाखविली. विद्यालयातील माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यानी या कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी मुख्याध्यापक संजय कदम, शिक्षक माऊली ढेरे, विक्रम भांडवलकर, अनुजा गारकर, उदिता उपाध्याय आदींची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती