जिल्हा_परिषद_शाळा_वाढोणा येथील विद्यार्थ्याचे नवोदय परीक्षेत घवघवीत यश....

====================
परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
परतुर तालुक्यातील वाढोना येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
 कु_अनुजा_अच्युत_शेळके, कु.अक्षरा गोपाळ तनपुरे या दोन मुलीनी घवघवीत येश संपादन केलेआहे. त्या विद्यार्थ्याचे परतूर तालुक्यातील व गावातील गावकऱ्यांकडून व शिक्षकाकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे खऱ्या अर्थाने या यशामागे शिक्षकांनी घेतलेली खरी मेहनत याचे फळ विद्यार्थ्याला मिळाले आहे. तसेच कोणतीही गोष्ट 
 शिक्षकाने मनावर घेतली व वेळ दिला तर शाळेचा नावलौकिक होतो .शाळा हे माझे दैवत आहे. या भूमिकेतून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी कायम तत्पर असणारे ' शिक्षक तथा मु.अ . श्री. राजेश लोखंडे ,श्री विनायक भिसे तसेच श्री संजय कासतोडे यांच्या वाढोणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे ही पावती शिक्षकांची मेहनत आणि शेतकरी कुटुंबातील मुलींच्या कष्टाचे फळ आहे . 
 शाळे मधील दोन विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे . गतवर्षी तीन विद्यार्थी आणि यावर्षी दोन विद्यार्थी यांनी नवोदय परीक्षेमध्ये यश संपादन केलेले आहे खरंतर ही मुले शेतकऱ्याची लेकरं नवोदय विद्यालयाला पात्र केली आहेत , त्यासाठी यांचे जे कष्ट आहेत निश्चितच त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि ते सन्मानाला पात्र आहेत , या बद्दल शालेय व्यवस्थापन. समीतीचे अध्यक्ष श्री. नागेश तनपुरे व उपाध्यक्ष श्री. विजय शेळके तसेच समीतीचे सर्व सदस्य व सरपंच श्री. सुरेश शेळके व सर्व ग्रा. पंचायत सदस्य व गावकरी यांनी विध्यार्थी तसेच त्यांचे पालक व सर्व शिक्षकाचे आभिनंदन केले .
 व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती