मंठा शहरात अभाविपच्यावतिने तिरंगा ध्वज पदयात्रा संपन्न,५०१ फुट लांबीचा भव्य तिरंगा ध्वज


मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
 दि.१३अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मंठा शहरामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य अशी ५०१ फूटी विक्रमी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. स्वामी महाविद्यालय, मंठा येथे भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. 
      स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथून लहुजी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, मार्केट कमिटी, बस स्टैंड, जय श्री राम चौक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या मार्गाने ही पदयात्रा काढण्यात आली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' अशा घोषणा देत मंठा शहरामध्ये विद्यार्थी कार्यकर्त्यांनी या पदयात्रेमध्ये आपला सहभाग नोंदविला. गाव गाव में जायेंगे, भारत नया बनायेंगे, 'स्वामी जी का क्या संदेश सुंदर सुहाना भारत देश' या घोषणेने मंठा शहर दुमदुमून गेले. या तिरंगा पदयात्रेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधि, सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वागत करीत आपला सहभाग नोंदविला. 
   पदयात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे राष्ट्रगीताने झाला.यावेळी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, 
प्रदेश उपाध्यक्ष प्रा.नाना गोडबोले,प्रदेश सहमंत्री सुरज पावसे ता.प्रमुख सचिन बोराडे, अभाविप शहरमंत्री संदिप गायकवाड,विभाग संयोजक ऋषिकेश राऊत,निलेश बोराडे,नितिन राठोड,नंदु टकले,दुर्गेश राठोड,राहुल राठोड,निवास राठोड , प्रा.संजय चव्हाण, राष्ट्रिय स्वंसेवक सेवक संघ, बजरंग दल,मंठा शहरातील सर्व महाविद्यालय,पोलिस प्रशासन, मंठा शहरातील परिवार, सर्व विद्यार्थी बंधू,भगिनिंनी उपस्थित होते.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान