परतूर ( आशिष धुमाळ) तालुक्यातील हातडी शिवारात 11 मार्च शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास गावातील सचिन शिंदे सह काही शेतकर्यांना शेतात काम करत असतांना बिबट्या निदर्शनास पडला.या घटनेला सरपंच मधुकर झरेकर यांनी दुजोरा दिला आहे. बिबट्याची व्हिडिओ क्लिप परतूर परिसरात सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. परिसरातील शेतात बिबट्याच्या पायाचे ठस्से सुध्दा दिसल्याचे शेतकर्यांनी सांगितले.गावकर्यांनी व सरपंच मधुकर झरेकर यांनी बिबट्या आढळ्याची माहिती वनविभागाला देताच वनविभागाचे व्हि.पी. अवचार घनसावंगीचे वनरक्षक पवार व वनमजुर यांनी हातडी शिवारात हजर होत पायाच्या ठस्यावरून बिबट्याचा शोध सुरू केला आहे. शेतकर्यांनी एकटे शेतात जाऊ नये तसेच पाळीव प्राण्याची काळजी घेण्याचे आवाहन सरपंच मधुकर झरेकर व वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
. परतूर ता.28(हनूमंत दवंडे)) येथे रेल्वे गेट च्या काही अंतरावर म्हैशि चरत होत्या त्यातील एक म्हैश रेल्वे पटरीवर आल्या त्याच वेळेस नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्सप्रेस आली व त्याखाली चिरडून एका जणासह म्हैस ठार झाली आहे ही घटना मंगळावर ता.२८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. आपल्या निर्धारित वेळेत नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस परतूर स्थानक पार करून मार्गस्थ झाली असता आष्टी कडे जाणाऱ्या रेल्वेगेटच्या जवळच रुळावर उभ्या असलेल्या म्हैशीला हाकलण्यासाठी -सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले ( वय 60 ) हे गेले असता म्हशीसह त्यांचा या रेल्वेखाली येऊन मृत असल्याची घटना घडली. दरम्यान,घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे हे आपल्या सहकाऱ्या सह घटनास्थळी दाखल झाले.यातर मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. उतरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस एएसआय चव्हाण , जीआरपिएफ बोराडे,टेकाळे यांनी दिली. .......................... फोटो--सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले
परतूर (हनूमंत दवंडे)- परतूर सेलू रोडवर चिंचोली पाटीजवळ आज सायंकाळी साडे सहा च्या सुमारास आयशर ने दोन मोटारसायकल ला जोराची धडक दिली धडक इतकि जोरात होती कि मोटारसायकल वरील एक जणाचा जागिच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परतूरहून सातोन्याकडे जाणाऱ्या मोटारसायकल ला चिंचोली पाटीजवळ भरधाव आयशर ने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल वरील संजय वाघमारे रा सातोना हे जागीच ठार झाल्याची माहिती असून तीघे गंभीर जखमी झाले आहेत. या मधे शिवाजी मस्के व त्यांची पत्नी होती त्यांच्या पत्नी चे हात तुटले आहेत. जखमी दोघे ही जिंतूर तालुक्यातील राहणारे आहेत. तर एक जण हातडी येथील रहिवासी असल्याचं कळत आहे हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकली चा चकनाचूर झालेला आहे. परतूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत अंभुरे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवले असल्याची माहिती आहे परतूर पोलीस स्टेशन मध्ये अपघाताचा गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु चालू असून अपघात मधील आयशर स