परतूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने परतूर ते आंबा आजादी गौरव पदयात्रा

परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
महाराष्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या वतीने अमृत महोत्सवा निमित्त 'आजादी गौरव यात्रा काढण्यात येणार असून यात्रेचे नेतृत्व मा.आ. सुरेशकुमारजी ''जेथलिया' हे करणार आहेत...

शनिवार दि. 13/08/2020 रोजी सकाळी 10 वा. मा.आ. सुरेशकुमारजी जेथलिया यांच्या संपर्क कार्यालय, परतूर ते बागेश्वरी देवस्थान,आंबा पर्यंत ही गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्याची गौरव गाथा जनतेमध्ये बिंबवण्यासाठी व भारतीय स्वातंत्र्यातील सहभागी स्वातंत्र्यवीरांना वंदन करण्यासाठी, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी ही आजादी गौरव पदयात्रा काढण्यात येत आहे.

या पदयात्रेत काँग्रेस कमिटीचे जालना जिल्हा अध्यक्ष मा. श्री. राजाभाऊ देशमुख, आ.राजेश राठोड,मा.श्री. राजेंद्रजी राख, मा. कल्याणरावजी दळे, अन्वरबापू देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

या आजादी गौरव पदयात्रेचा समारोप बागेश्वरी मंदिर प्रांगण आंबा येथे होणार असून, या यात्रेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन,परतूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

मंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न