यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथील विद्यार्थ्यांनी साकारल्या गणरायांच्या आकर्षक मूर्ती.....

  परतूर प्रतीनिधी हनुमंत दवंडे 
   तालुक्यातील यश प्रायमरी इंग्लिश स्कूल तसेच यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सातोना खुर्द या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी चिखलापासून गणपती बाप्पांच्या सुंदर मूर्ती बनवण्याचे आठवडाभर प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांनी स्वतः मूर्ती तयार करण्यासाठी प्रयत्न करावा तसेच याच स्वनिर्मित मूर्तीचीच आपल्या घरी व शाळेत स्थापना करावी अशी संकल्पना संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष बालासाहेब सितारामजी आकात यांची होती. मुख्याध्यापक जयराम खंदारे , अनिल बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या स्पर्धेत वर्ग पहिली ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आकर्षक अशा मूर्ती साकारल्या.  
   सर्व विद्यार्थ्यांना इकोफ्रेंडली व सोप्या पद्धतीने चिखलापासून गणपती बनवण्याचे प्रशिक्षण सर्व शिक्षकांनी दिले. यासाठी पालकांनीही मोलाचे सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरज दूधगोंडे , दीपा सावंत व भावना पाटिल ,सरिता गायकवाड , ज्योती बिडवे , महादेव गायकवाड़,गणेश गोरे, तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि