नवरात्रोत्सवात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर हा अत्यंत स्तुत्य उपक्रम- माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर,नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ०९ दिवसीय महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा माता भगिनींनी लाभ घ्यावा- डॉ.सौ.उषा कल्याण मोरेमंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
 "शिवसृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था" व "मोरे हॉस्पिटल मंठा"च्या संयुक्त विद्यमाने रेणुकादेवी मंदिर नवरात्र उत्सव यात्रा ०९ दिवसाचे खास महिलांसाठी "मोफत आरोग्य तपासणी शिबिर" आयोजित करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. मोरे हॉस्पिटल मंठा यांच्या वतीने महिलांच्या विविध आजारांची तपासणी उपचार व मार्गदर्शन यावर आधारित मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसृष्टी संस्था व मोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या या मोफत आरोग्य शिबिरामधून नक्कीच सर्वसामान्य महिला माता-भगिनींना तपासणी उपचार व मार्गदर्शनाच्या माध्यमातून फायदा होईल मोरे हॉस्पिटल च्या वतीने आयोजित महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर अत्यंत स्तुत्य उपक्रम असून स्वयंसेवी संस्थांनी अशा प्रकारे जनसेवेचा वसा हाती घ्यावा व सर्वसामान्यांची सेवा करावी अशी अपेक्षा यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले व मोरे हॉस्पिटलच्या महिला मोफत आरोग्य तपासणी शिबिराला शुभेच्छा दिल्या.

नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये प्रसुती पूर्व व प्रसुती पश्चात तपासणी व उपचार, लाल पदर, पांढरा पदर, ओटी-पोटात सूज, गर्भाशयाचे आजार, मासिक पाळीच्या समस्या, लघवीला जळजळ होणे, वंधत्व तपासणी मार्गदर्शन व उपचार, रक्तदाब मधुमेह व थायरॉईड साठी उपचार, स्तनांचे आजार, रक्त कमी असणे, भूक न लागणे, सतत थकवा जाणवणे, मान पाठ कंबर व गुडघेदुखी यासारख्या विविध आजारांवर तपासणी उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिराचा अधिकाधिक माता-भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन मोरे हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.सौ.उषा कल्याण मोरे पाटील व संचालक डॉ.कल्याण मोरे पाटील यांनी केले आहे.

यावेळी "मोरे हॉस्पिटल मंठा"चे संचालक डॉ.कल्याण मोरे पाटील, डॉ.सौ.उषा कल्याण मोरे पाटील, प्रा.सहदेव मोरे पाटील, गणेशराव खवणे शरदराव बोराडे, सतीश निर्वळ, राजेश मोरे, नागेशराव घारे, सुभाष राठोड पंजाबराव बोराडे, विठ्ठलराव काळे, शेषनारायण दवणे, प्रसादराव गडदे, प्रसादराव बोराडे, राजेभाऊ खराबे, कैलास चव्हाण, शिवाजी थोरवे, शरद मोरे, अशोक मोरे पाटील सौ प्रियांका अशोक मोरे पाटील आर.आर.कुलकर्णी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान