वाई येथे जनावराचे मोफत लसीकरण
मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
  वाई ग्रामपंचायत च्या वतीने लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या लंपी साथरोग प्रतिबंधक लस देण्यात आली या मोहिमेचा समारंभ वाई गावचे सरपंच परमेश्वर उबाळे तसेच उपसरपंच सुनील दत्तात्रय ठाकरे तसेच गावचे मानकरी नारायण पाटील उबाळे यावेळी हजर होते
     सुमारे चारशे ते साडेचारशे जनावरांना या मोहिमेअंतर्गत लस देण्यात आली वाई गावातील नागरिक शेतीसह मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय करतात सद्यस्थितीला लंबी हा सात रोग झपाट्याने वाढत असल्याने शेतकरी व पशुधन पालक चिंतेत आहेत शासनाकडून लपी प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्याने सरपंच परमेश्वर उबाळे तसेच पत्रकार रामेश्वर उबाळे यांनी पुढाकार घेऊन खाजगी लस उपलब्ध करून दिली.
त्यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण सर तसेच डॉक्टर मानमोडे सर तसेच त्यांची पूर्ण टीम वाई गावात दाखल झाली तसेच सरपंच यांनी जनजागृती करताना शेतकऱ्यांनी जनावरांचे गोटे फवारून घ्यावे लिंबाचा पाला दिवस माळवतेच्या वेळी लिंबाच्या पानाचा धूर करावा असे आवाहन केले.
 
  
Comments
Post a Comment