दैठना खुर्द शिवारातील कसूरा नदीवरील पूल गेला वाहून, कसूरा नदीवरील रस्त्यातील पूल उभारण्याची मागणी

 परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
       दैठना खुर्द शिवारातील शेतीकडे कसूरा नदीवरुण जाणारा पूल पावसाने वाहून गेला आहे. नवीन पूल उभरा नसता जलसमाधी घेण्याचा इशारा येथील शेतकर्‍यांनी तहसीलदारकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी दिलेलेल्या निवेदनात म्हटले आहे की दैठना खुर्द येथील पिंपळगाव रोड ते कुलकर्णी वस्तीकडे जाणार्‍या रस्त्यावरील कसूरा नदीवरील पूल दि २७ व २८ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या पावसाने वाहून गेला आहे. कुलकर्णी वस्तीकडे हातडी लघु सिंचन तलावच्या खाली कसूरा नदी जात आहे. या नदी वरील पूल झालेल्या पावसाने नदीला पुरात वाहून गेला असल्याने या भागातील शेतकर्‍यांची शेती असल्याने अनेकांना शेती वहिती करण्यास अडचणी येत आहेत. या रस्त्यावरील पूल तात्काळ निर्माण करावा आमचे शेती मशागत करण्यासाठी जात येत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. तात्काळ पूल उभारून रस्ता करावा नसता या पुलावरील पाण्यात जलसमाधी घेण्यात येईल. घडलेल्या घटनेला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. अण्णासाहेब सवने, विलास भदर्गे, भीमराज तयाडे, संदीप शिंदे, अमोल सवने, गणेश कदम, अमर राकूसले, लक्ष्मण मोरे, भगवान सोळंके, यांच्यासह आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
 

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान