सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

प्रतीक जोशी यांना संस्कृत काव्यशास्त्र विषयात पीएचडी

परभणी प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
        येथील आचार्य वेदशास्त्र पाठशाळेचे विद्यार्थी श्री प्रतीक प्रमोदराव जोशी यांना  दि.१२ऑक्टोबर रोजी कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक,नागपूर यांच्यामार्फत पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी संस्कृत काव्यशास्त्र या विषयात पीएचडी करताना "जगन्नाथोत्तराणां प्रमुखकाव्यशास्त्रीय ग्रंथानां समीक्षणात्मकम् अध्ययनम्" या विषयावर आपला प्रबंध मार्गदर्शक डॉ.पराग जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. 
    त्यांना त्यासाठी त्यांचे गुरुजी वेदांतकोविद प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाचाही लाभ झाला. भागवतकार असलेल्या प्रतीक जोशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सर्वश्री हभप माधवराव आजेगावकर, प्रमोदशास्त्री कुलकर्णी, नरहरी गुरुजी एरंडेश्वरकर, शंकर आजेगावकर, सर्वोत्तम पाथरीकर, विश्वजीत कुलकर्णी, चंद्रकांत साळेगावकर गजानन खळीकर प्रसाद रोपळेकर विलास कौसडीकर किशोर पुराणिक उपेंद्र दुधगावकर आदींनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत