अखिल भारतीय मराठा महासंघ देवठाणाच्या वतीने वृक्षारोपन


मंठा - प्रतिनिधी सुभाष वायाळ
       दि.०७मौजे देवठाणा उस्वद अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा देवठाणाच्या वतीने वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक दुर्गा मंडळ देवठाणा जगद् गुरु तुकाराम महाराज सृष्टी या स्थळी कार्यक्रमाचे आयोजन केले. 
          या कार्यक्रमाचे उद्घाटक भगवानराव महाराज सरकटे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका अध्यक्ष मंठा बाळासाहेब देशमुख होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन अखिल भारतीय मराठा महासंघ युवक ता. अध्यक्ष मुकुंद गोटे, शाखा अध्यक्ष दिपक वरकड, मानिक वरकड हे होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व सर्व आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस हार अर्पन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुकुंद गोटे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब देशमुख यांनी विचार व्यक्त केले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे सामाजिक धोरण यावर प्रकाश टाकला तसेच सारथी सारख्या योजनेचा व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व पंजाबराव देशमुख वसतीग्रहाचा लाभ समाज बांधवांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
 यावेळी उद्घाटकीय भाषणात संबोधीत करतांना ह.भ.प. भगवान महाराज सरकटे म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्र आणि लाखो लोकांचे संघटन करतांना एकमेव मराठा क्रांतीचा सूर्य स्व. आण्णासाहेब पाटील हेच आहे त्यांच्या समाजासाठी हालचाल करणारा एकाही नेता महाराष्ट्राने बघितला नाही. नंतर त्यांच प्रेरणेने चळवळ सुरु झाली वेगवेगळ्या समाजाराच्या संघटना निर्माण झाल्या माथाडी कामगारांसाठी कायदा निर्माण करुन त्यांना न्याय देण्याचे कार्य स्व. आण्णासाहेबांनी केले. म्हणुन आतातर समाजासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज पुरवठा करुन उद्योग व्यवसाय करण्यासाठी 15 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करता येतो. यासाठी स्वत:चे आत्मबलिदान करुन मराठा समाजाला न्याय देणारा नेता हुतात्मा स्व. आण्णासाहेब पाटील आहे. यावेळी सामाजिक संघटन वाढून स्व. आण्णासाहेबांचे विचार घरा घरात पोहचविले पाहिजे आणि त्यांनी समाजासाठी काय केले याची माहिती घराघरात पोहचविली पाहिजे.
 या कार्यक्रमाचे सूत्र संचालन बबनराव मोरे यांनी केले, मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. 
 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीया मराठा महासंघ देवठाणा (उस्वद) राहूल देशमुख ज्ञानेश्वर देशमुख, पेंडगावकर, प्रवेश येवले, सिध्देश्वर मोरे, पवन मोरे, शुभम देशमुख, गणेश देशमुख, उमेश मोरे, पुरुषोत्तम मोरे, वैभव देशमुख, अशोक मोरे, पंढरीनाथ मोरे,भगवान पेडगावकर, विठ्ठल शिंदे, गजानन मोरे, नवनाथ पाटील, बंडू देशमुख,श्रीहरी मोरे, विशाल मोरे, प्रतीक मोरे,किरण मोरे,किरण देशमुख,बाळू देशमुख, विष्णू देशमुख, पांडुरंग देशमुख, रावसाहेब मोरे, किरण देशमुख, उमेश कदम, सोमनाथ मोरे, विठ्ठल कदम, अशोक शिंदे, रामेश्वर मोरे, अवि मोरे, राम मोरे, शुभम देशमुख, विनोद देशमुख, दिपक मोरे, रामेश्वर देशमुख, किरण मोरे आदींची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण