साईनाथ यात्रेचा शुभारंभ यात्राकाळात दिंडी मार्ग व परिसरातील विद्युत दिवे चालू करावे - मा.आ. जेथलिया

 परतूर प्रतिनीध कैलाश चव्हाण                                      गेल्या 64 वर्षाची परंपरा असलेल्या परतूर येथील साईबाबा यात्रेला दोन वर्षा च्या कोरोनाच्या काळातील खंडा नंतर यंदा उत्साहात सुरवात झाली, आज दिनांक 24 रोजी मा.आ. सुरेशकुमार जेथलिया, राष्ट्रवादीचे जालना जिल्हा युवक अध्यक्ष कपिल आकात, वैजनाथ बागल,बाबुराव हिवाळे, रहेमूसेठ कुरेशी, राजेश खंडेलवाल यांच्या प्रमुख उपस्तीतीत जागा वाटपाचे उदघाटन संपन्न झाले 
      या वेळी मोठ्या संख्येने परिसरातील व्यापारी, नागरिकांची उपस्तीथी होती. उद्या पासून या यात्रेला सुरवात होत असून सदरलील यात्रा 5 फेबुरवारी पर्यंत चालू राहणार असून महाप्रसादाने याची सांगता होणार असल्याची साईनाथ मंदिराचे पुजारी रामेश्वर वंगुर यांनी दिली. यावेळी आपल्या मनोगतात मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी म्हटले की दोन वर्षाच्या खंडा नंतर चालू होणाऱ्या या यात्रेला यंदा जास्तच महत्व येणार असून यावेळी यात्रेत पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भाविक, यात्रेकरू हजेरी लावणार, याबाबत मी पालिका प्रशासन तथा स्वच्छता विभागाला सूचना देत यात्रेचा परिसर स्वच्छ करून घेतला, योगा योगाने यंदा दिंडी मार्गाचे काम पूर्ण होऊन साईनाथ मंदिर ते पेट्रोल पंप, रेल्वे स्थानक रोडवर विधुत खांब उभारले आहे, यात्रा निमित्त सदरील विद्युत पुरवठा चालू करण्याच्या सूचना मी संबंधित विभागाला दिल्या असल्याने म्हणाले, यापूर्वीच दसऱ्याला साईनाथ मंदिर चौकातील हायमास्ट दिवा नगरपालिकेकडून चालू केला असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान