आ.लोणीकरांचे हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप.


 परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे द्वारा आयोजित " मन की बात ", या ऊपक्रमाअंतर्गत " परीक्षा पे चर्चा " या संदर्भात विवीध विषयावार शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

श्री समर्थ माध्यमिक विद्यालय पाटोदा[ माव ] या शाळेतुन या चित्रकला स्पर्धेसाठी मोठ्या संखेने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व सहभागी स्पर्धकांमधुन प्रथम तिन विजयी स्पर्धकांना माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांचे हस्ते जवाहर नवोदय विद्यालय आंबा येथे आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षिस देवुन सन्मानीत करण्यात आले.
या स्पर्धेत शेख सानिया नबी, प्रतिक्षा गायकवाड , करण बोराडे या स्पर्धकांनी यश मिळवले. 
शासनाच्या विवीध शैक्षणिक ऊपक्रमात श्री समर्थ माध्यमिक विद्यालयाचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो या बद्दल मा. आमदार लोणीकर साहेबांनी समाधान व्यक्त करुन मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर व सर्व सहकार्यांना शुभेच्छा दिल्या.
केंद्रप्रमुख श्री शंकरराव थोटे गट समन्वायक कल्याणरावा बागल यांनी ही समर्थ टिमचे अभिनंदन केले.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान