छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, जगभरात छत्रपती शिवरायांसारखा दुसरा राजा होणे नाही - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,जितेंद्र आव्हाड यांचे बेताल वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत भूमिका आहे का? - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा अजित पवार यांच्यासह जयंत पाटील यांना सवाल


प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते शिवरायांच्या व्यतिरिक्त रयतेचे राजे असे इतर कोणत्याही राजाला संबोधल्या गेले नाही असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे ते वारंवार शिवरायांचा अपमान करणारी वक्तव्य करत असून शिवप्रेमी जनता त्यांना बदडून काढेल अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड वारंवार हेतूपुरस्सर व जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत असून औरंगजेब शाहिस्तेखान किंवा अफजल खान यांचे उदात्तीकरण करण्याचा कायम प्रयत्न करत आहेत, जितेंद्र आव्हाड हा मूर्खपणा वारंवार करत आहेत परंतु शिवरायांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या १०० पिढ्या यामुळे बरबाद होतील अशा शब्दात माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना फटकारले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वारंवार औरंगजेब शाहिस्तेखान अफजलखान यासारख्या स्वराज्य दोन्ही व महाराष्ट्र द्रोही असणाऱ्यांचे उदातीकरण केले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मते औरंगजेब हा क्रूरकर्मा नसून सूफी संत होता तर अफजल खान हा शिवरायांना मारण्यासाठी आला नव्हता अशा प्रकारची मुक्ताफळे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांच्या नेत्यांकडून उधळली जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वारंवार अशा प्रकारची शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी वक्तव्य केले जात असून या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा औरंगजेब, शाहिस्तेखान, अफजल खान हे अधिक चांगले होते असे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका बनत चाललेली आहे की काय अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्य शिवप्रेमींना पडतो आहे असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले

जितेंद्र आव्हाड शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्य वारंवार करत असून स्वराज्यद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही असणाऱ्या औरंगजेब शाहिस्तेखान किंवा अफजलखान सारख्या क्रूरकर्म्यांची उदातीकरण करण्याचा कायम प्रयत्न करत आहेत असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणतीही ठोस भूमिका किंवा जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात नाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही याचाच अर्थ जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेली भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत भूमिका आहे का असा सवाल देखील माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना विचारला आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती