स्वच्छता अभावी नागरिक दुर्गंधीने त्रस्त, परतूर नगरपालिकेचे दुर्लक्ष.


परतूर/ सरफराज नाइकवाडी.
     परतूर शहरातीलगाव भागातील नाइकवाडी गल्ली, धनगर गल्ली. माली गल्ली, परकोटा गल्ली, याभागात स्वच्छता होत नसल्याने  येथे नाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहत असून, या पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे, तसेच दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे, परंतु परतूर नगर परिषदेचे नाल्याची साफ सफाई व स्वच्छतेकडे दुर्लक्ष असून, नगरपरिषदेला नागरिकांच्या आरोग्याशी काही देणे घेणे नसल्याचे चित्र दिसत आहे, यादुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत, याभागातील नगर सेवकांनी देखील येथील नागरीकांच्या समस्यांकडे हात वर केलेले आहेत, अंदाजे दीड वर्षापासून परतूर नगर परिषदचा कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे, पालीकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहे, मुख्याधिकारी सुधीर गवळी यांची इतर ठिकाणी बदली झालेली आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहरातील स्वच्छता सफाईकडे नगर परिषदेचे कर्मचारी लक्ष देत नसल्याने ही अवस्था झालेली आहे. सर्वसामान्य नागरीक त्रस्त झालेले आहे. नगर परिषदेने नागरिकांच्या  आरोग्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेले आहे.  दुर्गंधीमुळे जनता त्रस्त झालेली आहे. मुख्य अधिकारी पदाचा तातपुरता पदभार मंठा येथील मुख्याधिकारी रितेश बैरागी यांना देण्यात आलेला आहे.  कायम स्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नगर परिषदेत  नागरीकांच्या तक्रारी कोणी एकत नाही, तक्रार घेण्यासाठी कोणी अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांनी आता कुणाकडे तक्रार करावी हेच समजत नाही, प्रशासक म्हणून अंदाजे दीड वर्षापासून परतूर येथील उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव हे नगर परिषदेचा कारभार पाहत आहे, परंतु शहरातील नागरिकांच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष असल्याचे दिसत नाही, तसेच परतूर नगर परिषदेतील मुख्याधिकारी सुधीर गवळी यांची मागील दोन-तीन महिन्यापूर्वी राजकिय वादातून बदली करण्यात आल्याचे समजते म्हणून या जागेवर मंठा येथील मुख्याधिकारी रितेश बैरागी यांना तात्पुरता पदभार देण्यात आलेला आहे. मुख्याधिकारी बैरागी यांचा कार्यकाळ सुद्धा मंठा येथे पारदर्शक   राहिलेला नाही, त्यांच्याबाबत तेथील नागरिकांच्या खूप तक्रारी आहेत, मात्र त्यांना परतूर येथील नगरपरिषदेचा देखील तात्पुरता चार्ज देऊन प्रशासनाने परतुर येथील नागरिकांच्या डोळ्यावर पाणे पुसली आहे, सर्वसामान्य नागरीकांना दैनंदिन गरजा अवशयकता आहे  स्वच्छतेची सफाईची, जिल्हाधिकारी यांनी याबाबत नागरीकांच्या समस्यांची दखल घेत त्वरित स्वच्छतेचे आदेश द्यावेत अशी येथील नागरिकांची मागणी आहे,

कोटः- नागरीकांच्या समस्यांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे, याभागात स्वच्छता होत नसल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. नाल्या व ढापे फुटल्याने यातील घानपाणी मुख्य रस्त्यावर येत आहे. यामुळे दुर्गंधी वाढली आहे गटार योजनेचे काम बंद पडले आहेत मुख्य रस्ते यामुळे खराब झालेत, याकामाकडे लोकप्रतिनिधी देत नाहित, परवेजखान पठाण नागरीक.नाइकवाडी गल्ली परतूर.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी