कृषी बाजार समिती निवडणूक युवा ने लढवावी - सचिन खरात (ता.अध्यक्ष शिवसंग्राम)


 परतुर । प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
        परतुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आता युवा शेतकरी पुत्रांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी अन् सुलतानी दोन्ही संकटे ओढवत असताना शेतकरी पुत्रांनी हक्काच्या कृषी बाजार समिती व शेतकरी हित चळवळ उभा करावी परतुर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या बाबत समाधानकारक असे काहीच काम होत नाही, शेतकऱ्यांच्या हितासाठी आता शेतकरी युवा पुत्रांनी पुढाकार घेतला असून शेतकरी कृषी बाजार समितीची निवडणूक लढवावे असे आव्हान शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी केले. कृषी बाजार समितीमध्ये गेल्या काही काळापासून निवडक व्यक्तींची सत्ता आहे. या ठिकाणी अपहार, असुविधा या बाबी वारंवार पुढे आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना बाजार समितीत विश्राम व्यवस्था चांगली नाही, बाजार समिती इमारती बांधकाम झालेले आहे मात्र तेथील परिस्थिती मरणासन्न अवस्थेत आहे. बाजार समिती शेतकऱ्यांचा विश्वास संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे जिंकू शकलेली नाही म्हणून आता शेतकऱ्यांच्या पोरांनी पुढाकार घेने आवश्यक आहे संपूर्ण जागेवर युवा शेतकरी उभे करून विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हंटले आहे. कृषी बाजार समितीमध्ये गेल्या काही काळापासून निवडक व्यक्तींची सत्ता आहे. यावेळी बदल होणं आवश्यक आहे.या कृषी बाजार समिती ठिकाणी अपहार, असुविधा या बाबी वारंवार पुढे आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना बाजार समितीत विश्राम व्यवस्था चांगली नाही, बाजार समिती इमारती बांधकाम झालेले आहे मात्र तेथील परिस्थिती मरणासन्न अवस्थेत आहे. बाजार समिती शेतकऱ्यांचा विश्वास संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे जिंकू शकलेली नाही म्हणून आता शेतकऱ्यांच्या पोरांनी पुढाकार घेने आवश्यक आहे संपूर्ण जागेवर युवा शेतकरी उभे करून विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे सचिन खरात यांनी म्हंटले आहे.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान