अवैध वाळू उपश्यावर कारवाई करा, मंठा तहसीलदार कैलासचद्र वाघमारे याच्या आशीर्वादाने वाळू उपसा जोरात महसूल व पोलीस प्रशासन कोमात नेमलेली पथके भूमीगत ,तळणी सरपंच सदावर्ते यांची मागणी



तळणी : रवी पाटील 
 तळणी परीसरातील पूर्णा नदी पाञातून चालू असलेल्या अवैध वाळू उपश्याची मंठा तहसीलदार यांना वारवार कल्पना देऊन सुध्दा त्यावर प्रतिबंध होत नसल्याने जिल्हाधिकार्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यानी सांगीतले सद्या सपूर्ण तळणी परीसरात अवैध वाळू रिचवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे मिळेल त्या ठिकाणी वाळू साठवण्याचा व विक्रीचा सपाटा लावला आहे या अवैध वाळू उपश्यास महसूल व पोलीस प्रशासन जबाबदार असून अर्थ नितीच्या धोरणा मुळे या दोनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे गावामध्ये वाळू साठवताना सुसाट वाहने सुटत आहे तळणी बस स्टँन्ड परिसर व गावात येणारा एकमेव रस्ता असून या ठिकाणी नेहमी वर्दळ असते याच ठिकाणावरून वाळूचे वाहने सुसाट सुटत आहे दोनच दिवसा पूर्वी दोन पाळीव कुत्र्याच्या अंगावरून गाडी नेल्याचा प्रताप त्या रात्री घडला आहे राञीच्या वेळेत येणारी वाळूची वाहने ग्रामस्थासाठी ञासदायक ठरत आहे 
तहसीलदार गेले चार दिवसापासून भूमीगत झाल्यापासून त्यानी नेमलेले पथके सुध्दा भूमीगत झाले आहे वाळू माफीयांना उत्खननाची सधी मिळावी म्हणून तहसीलदार तीन दिवसापासुन गायब आहे पोलीस प्रशासनाचा कुठलाच धाक माफीयांना नसल्याकारणाने त्याचे फावत आहे 
देवठाणा उस्वद कानडी लिबंखेडा सासखेडा वाघाळा भूवन किर्ला टाकळखोपा हनवतखेडा केधळी पोखरी व अन्य पूर्णा नदी काठच्या गावामधून अवैध वाळू ऊपसा तहसीलदाराच्या कृपाद्रष्टीने चालू आहे 

अवैध वाळूची माहीती तहसीलदारांना देऊन सुध्दा कारवाई होत नाही तहसीलदार यांच्या बदलीच्या चर्चमुळे ते गेल्या चार दिवसापासून भूमीगत आहे महसुल प्रशासन व पोलीस प्रशासन व वाळू माफीयाच्या मधूर संबंधा मुळे वाळू माफीयांचे फावत आहे अवैध वाळू उपश्याची वाहने स्वःत अडवणार असल्याचे तळणी सरपंच गौतम सदावर्ते यानी सांगीतले

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण