सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

बेकायदेशीरित्या विदेशी दारुच्या मालाची चोरटी वाहतूक करताना इसमास अटक

 परतूर प्रतीनीघी कैलाश चव्हाण
दिनांक 09/08/2023 रोजी 12.30 वाजता ईसम नामे सिध्दार्थ शांतीलाल सदावर्ते हा वाटुर-परतुर रोडवर नागापुर येथील नायरा पेट्रोलपंपासमोर विनापरवाना बेकायदेशीरित्या विदेशी दारुच्या मालाची चोरटी विक्री करण्याच्या उददेशाने मिळुन आला आहे. सदर आरोपीकडून
विदेशी दारु Mc Donwells, Officer's Choice Blue Whisky, Royal Stag Deluxe, Imperial Blue किंमती 12800/- व मोटारसायकल असा एकुण 27800/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 सदरची कारवाई मा. तुषार दोशी पोलिस अधीक्षक , मा. डॉ. राहुल खाडे , अप्पर पोलिस अधीक्षक , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी .बुधवंत  ,  पोलीस निरीक्षक श्री.एम.टी.सुरवसे यांच्या मार्गदशनाखाली पोउपनि केंद्रे पोलीस अंमलदार किरण मोरे, गजानन राठोड व ज्ञानेश्वर वाघ यांनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत