युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट*,======================*विक्रांत पाटील ,राहुल लोणीकर,शिवानीताई दाणी, आदींचा शिष्टमंडळात समावेश*======================*युवकांचे प्रश्न आणि मराठवाड्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानी बाबत केली चर्चा*=======================

परतूर (प्रतिनिधी) आज दिनांक 16 रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या शिष्टमंडळाने महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील युवकांचे प्रश्न आणि मराठवाड्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड  नुकसाना संदर्भात चर्चा केली.
      या शिष्टमंडळात मध्ये युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर, शिवानी ताई दाणी, सुशील मेंगडे, युवती प्रमुख मीनाताई केदार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यां चा समावेश होता.
    यावेळी राज्यपाल महोदयांना राज्यातील युवकांचे कोरोणा संकटाच्या काळात प्रचंड असे नुकसान झाले अनेक युवा उद्योजक आर्थिक संकटात सापडले, शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला या विषयासह मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसाने अनेक नद्यांना महापुरे आली त्यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून सोयाबीन, मका कापूस,  इत्यादी नगदी पिकासह पपई, केळी ,ऊस द्राक्ष बगा, मोसंबी, यासह बागायती शेती ही उध्वस्त झाली या संदर्भामध्ये महामहिम राज्यपाल महोदयांनी लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली.
   राज्याचे सरकार युवक व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठली भूमिका घेत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे अशातच सरकार पंचनामे करण्याचा घाट  घालत असून असून, विनाअट शेतकऱ्यांना  आर्थिक मदतीची गरज असल्याचे शिष्टमंडळाने महामहिम राज्यपाल यांच्या लक्षात आणून दिले
   या वेळी राज्यपालाना निवेदन देऊन मराठवाड्यातीलशेतकऱ्यांच्या भावना कळवण्यात आल्या.या मध्ये मराठवाडयात गेल्या दोन महिन्या पासून पाऊस चालू आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी ढग फुटी मूळे मराठवाडा तील शेतीचे पूर्ण पणे नुकसान झाले असून जालना जिह्यातील 7 लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले त्यामध्ये कापूस,सोयाबीन, मका, बाजारी, मूग ,उडीद व इतर संपूर्ण खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहेत तर 6 हजार हेकटर जमिनीवरील केळी, मोसंबी, ऊस, संत्री, डाळींब, पेरू, सीताफळ आदी पिके हातची गेली आहेत 
     आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत