मराठवाडा मंडळातील अधिकारी व कर्मचार्यांच्या पदोन्नती बाबत होत असलेल्या अन्यायाविरोधात सामूहिक रजा आंदोलन
परतूर प्रतिनिधी
मराठवाडा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नती, कालबध्द पदोन्नती व इतर बाबतीत विभागीय व शासन स्तरावरून होत असलेल्या अन्यायाबाबत परतुर तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने 28 व 29 ऑक्टोबर रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे.
या संदर्भात परतूरच्या तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की औरंगाबाद विभागात रखडलेल्या पदोन्नत्या बाबत व प्रलंबित विभागीय चौकशी, फौजदारी खटल्यातील अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळाधिकारी, महसूल सहाय्यक तलाठी वाहन चालक शिपाई कोतवाल कर्मचारी यांच्या बाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही मागण्याबाबत शासनाने कोणतीही चर्चा न केल्यामुळे व मंजूर न केल्यामुळे विभागीय अध्यक्ष मराठवाडा महसूल कर्मचारी संघटना औरंगाबाद यांनी पुकारलेल्या 28 व 29 ऑक्टोबरच्या दोन दिवसीय सामूहिक रजा आंदोलनाला परतूर महसूल कर्मचारी संघटनेचे अधिकारी व कर्मचारी पाठिंबा देणार आहेत.
तहसीलदारांना देण्यात आलेल्या नियोजनावर एस.जी. पवार, ए.जी. शिंगाडे, व्ही.यु. पुरी, अब्दुल बाकी देशमुख, सी.एस. महावलकर, शेख रईस अब्दुल रशीद, व्हि.पी. नंद, मोहम्मद सुफियान, सरिता गुंजकर व्ही.के. दंडेवाड, एस.डी. वाघ, एक.के. टाकरस, ए.पी. देशपांडे, सविता सरकटे आदींची स्वाक्षरी आहेत.