पीक कापणी करूनच आणेवारी काढा नजर आणेवारी कालबाह्य- माजी मंत्री आ. लोणिकर


 मंठा ( प्रतिनिधी ) वॉटर ग्रीड ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून योजना चालवण्याची जबाबदारी त्या त्या ग्रामपंचायत ची आहे त्यासाठी गावाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले

मराठवाड्यातील पाणी पातळी मध्ये मोठी घट झाल्यामुळे  गेल्या चार-पाच वर्ष मराठवाड्याला 4000 टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जात होता या पार्श्वभूमीवर आपण मंत्री असताना परतूर मंठा विधानसभा मतदारसंघासाठी फिल्टर पाणी उपलब्ध करून देण्या साठी  परतूर विधान सभा मतदार संघासाठी मापेगाव व वांजोळा येथे वॉटर ग्रीड योजना मंजूर केली  त्यातील मापेगावच्या योजनेचे (176 गावे) पाणी मतदारसंघातील अनेक गावापर्यंत पोहोचले  असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले

मंठा येथील तहसील कार्यालयामध्ये आमदार बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली वॉटर ग्रीड योजना व वृक्ष लागवडी संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते यावेळी तहसीलदार सुमन मोरे जालना तहसीलदार श्रीकांत भुजबळ गट विकास अधिकारी धस, जालना गट विकास अधिकारी कुलकर्णी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रबदडे, मजीप्रा चे  उपकार्यकारी अभियंता  पाथरवाडी  तालुकाध्यक्ष सतीश राव निर्वळ सभापती संदीप भैय्या गोरे पंचायत समिती सभापती बीड पवार  उपसभापती राजेश मोरे जि प सदस्य पंजाबराव बोराडे  संभाजीराव खंदारे जि प सदस्य शिवदास हनवते नाथराव काकडे विठ्ठलराव काळे, अविनाश राठोड विभागीय वनाधिकारी वरुडे, वनक्षेत्रपाल मगरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार लोणीकर म्हणाले की मतदारसंघात राबवण्यात आलेल्या वाटर फिल्टर पाणी 12 रुपये 30 पैशांमध्ये 1000 लिटर मिळत असल्याने ग्रामस्थांना हे पाणी अतिशय स्वस्त पडत असून सरपंच ग्रामसेवक यांनी पुढाकार घेत या योजनेचा लाभ माफक दरामध्ये होत असल्याने करून घ्यावा असे सांगितले पुढे ते म्हणाले की सदरील योजनेचे वीज बिल, केमिकल, व मेंटेनन्स साठी येणारा खर्च ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी द्वारे द्यावयाचा असून प्रति कुटुंब जास्तीत जास्त 150 रुपये महिना या प्रमाणे फिल्टर पाणी उपलब्ध होत असल्याने या स्वस्त उपलब्ध असलेल्या फिल्टर पाण्याचा लाभ गावातील जनतेला मिळवून द्यावा असे आ लोणीकर यांनी सांगितले
  यापुढे योजना राबविन्याची जवाबदारी ग्राम पंचायतीची असून वाटर ग्रिड मुळे टंचाई निर्माण होणार नाही यासाठी मात्र ग्रामपंचायतींनी  सतर्कता दाखवत योजनेच्या मेंटेनन्स साठी लागणारा खर्च पाणीपट्टी वसुली करून निभवावा असेही ते म्हणाले
 गेल्या अनेक वर्षापासून मतदारसंघात दरवर्षी जानेवारीपासूनच टँकर लागायची मात्र ही योजना झाल्यामुळे मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी  पुढाकार घेतल्यास टंचाईचा सामना करावा लागणार नाही असेही ते म्हणाले

 आपण मंत्री असताना मतदार संघ व मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाई होती या अनुषंगाने आपल्या भागातील तीव्र पाणीटंचाई कशी दूर करता येईल यासाठी आपण गुजरात, आंध्र प्रदेश, ऑस्ट्रेलिया, इसराईल,आणि श्रीलंका येथे जाऊन ग्रीडची पाहणी करून हा प्रयोग मराठवाडाभर करण्या अगोदर प्रतिनिधिक स्वरुपात परतूर मंठा व जालना तालुक्यामध्ये वॉटरग्रीडचा प्रयोग केला  तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून या योजनेचे पाणी आज मतदार संघातील 100 गावांना पाणी मिळत असून उर्वरित गावांमध्ये लवकरच योजना पूर्णत्वास जाईल असे सांगतानाच या योजनेचा उपयोग ग्रामपंचायतींनी करावा असेही ते म्हणाले
जलयुक्त शिवार मुळे मोठा फायदा झाला
=======================
 पाणी आडवा पाणी जिरवा ही क्रांतीकारी योजना त्याकाळात वसंतराव नाईक यांनी राबविण्याचा प्रयत्न केला परंतु तेव्हा फारशी जनजागृतीची साधने उपलब्ध  नसल्याने योजनेचे फलित मिळाले नाही मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाच प्रकारची जलयुक्त शिवार योजना राबवली या योजनेचा आपल्या मतदारसंघातील अनेक गावांमध्ये मोठा फायदा झाल्याचेही ते म्हणाले *हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला हरितक्रांतीचे महत्त्वाकांक्षी स्वप्न दिलं होतं परंतु राज्यकर्ते त्या विचारांवर चालले नाहीत म्हणून मराठवाड्याचं वाळवंट झालं, परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महत्त्वाकांक्षी असणारी जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली व त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना वसंतराव नाईक साहेबांचे स्वप्न पूर्णत्वास गेलं असेही लोणीकर यावेळी म्हणाले*

वनीकरणाची जबाबदारी सामाजिक वनीकरण सोबतच ग्रामपंचायतींची, मंठा तहसील येथील अटल आनंदवन प्रेरणादायी
=======================
मंठा तहसील कार्यालयातील अटल आनंदवन हे वृक्ष प्रेमींसाठी प्रेरणादायी असून अत्यंत सुंदर पद्धतीने वृक्षांची लागवड व जोपासना करण्यात आली असल्याचे तसेच प्रशंसनीय असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले  महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत मंठा तालुक्यातील  गावातील शेतकऱ्यांनी  झाडे लावण्या संदर्भात प्रस्ताव दिलेले असून यापुढे तांत्रिक बाबींमध्ये सामाजिक वनीकरण विभागासह बदललेल्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन वृक्षलागवडीच्या कामात सहकार्य करण्याचे आमदार लोणीकर यांनी सांगितले
 सामाजिक वनीकरण विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने  सामाजिक वनीकरण विभागावर कामाचा ताण वाढत असून ग्रामपंचायतींनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन  वृक्षलागवडीच्या कामामध्ये सहभाग नोंदवावा असेही यावेळी माजी मंत्री  बबनराव लोणीकर यांनी सांगितले

पीक कापणी करूनच आणेवारी काढा
===============
पीक कापणी करूनच आणेवारी काढण्यात यावी कारण नजर आणेवारी ही इंग्रजांची आणि कालबाह्य ठरलेली पद्धत असून या पद्धतीने आणेवारी काढणे चुकीचे आहे त्यामुळेच 90 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेले असताना जानेवारी 55 टाक्याच्या पुढे निघाली आहे अशा पद्धतीने आणेवारी काढल्यास ती चुकीची ठरेल गावातील सरपंच चेअरमन ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग करूनच जानेवारी काढण्यात यायला हवी असे मत देखील यावेळी लोणीकर यांनी व्यक्त केले

या वेळी निवास देशमुख विलास घोडके बाबाजी जाधव प्रमोद बोराडे अशोक वायाळ कैलास चव्हाण नितीन चाटे रावसाहेब राठोड प्रसाद गडदे रावसाहेब वैद्य आनंद वैद्य नारायण बागल अशोक सोनटक्के संतोष बोराडेे रमेश वायाळ गंगाराम हावळे संजय गायकवाड गजानन शिंदे सतीश सद्वर्ते विनोद राठोड लक्ष्मण पवार बेबीताई खान महादेव हजारे सरपंच ग्रामसेवक यांच्यासह कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.