परतुर नगरपालिकेच्या सफाई कर्मचारी यांनी मांडल्या पाडेवार यांच्या कडे व्यथा
परतुर प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील परतुर नगरपालिकेच्या सर्व सफाई कर्मचारी यांनी सोमवार रोजी विविध समस्या बाबतीत सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार अर्जुन पाडेवार यांची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
सध्या गेल्या सहा महिन्यापासून कोरोना रोगामुळे सर्व सामान्य जनता हैरान असुन या कठीण काळामध्ये नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी यांनी पुर्ण परतुर शहरातील साफसफाई साठी मोलाची कामगिरी बजावली आहे. तसेच काँट्रॅक्ट दार यांनी महीण्याच्या १ तारखेला चा पगार करावी महिन्याच्या महिन्याला पगार केली तर चागले होईल, पगार वेळीच झाले नाही तर गोरगरीब कर्मचारी यांना उसनवारी करून मुलाबाळांचे पोट भरावे लागत आहे,. अनेक कर्मचारी नगरपालिकेत गेल्या तिस वर्षापासुन आपली सेवा बजावत आहेत, या मध्ये अनेक कर्मचारी कायमस्वरूपी होण्याची वाट पाहून मयत सुध्दा झाले आहे. जे कर्मचारी मयत झाले आहे त्यांच्या जागी बदलीवर त्यांच्या वारसाला कामावर घेण्यात यावे, जे कर्मचारी आपली सेवा बजावित असतांनाच आजारी पडले आहेत त्यांच्या बद्दल्यात त्याच्यां च वारसाला कामावर घ्यावे, तसेच काँट्रॅक्ट दारांनी लावलेला मुकादम कामावर येणार्या कर्मचारी यांना थोडा ऊसिर झाला की दमदाटी करत आहे, जुने कर्मचारी यांना तात्काळ कायमस्वरूपी करण्यासाठी अर्जुन पाडेवार यांनी स्वाता पुढाकार घ्यावा या सह अनेक मागण्या सफाई कर्मचारी यांनी अर्जुन पाडेवार यांच्या कडे मांडल्या आहेत, यावेळी लवकरच या संदर्भात नगरपालिकेच्या नगराध्यक्ष विमलताई जेथलीया, मुख्याधिकारी गवळी यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पाडेवार यांनी नगरपालिकेच्या सर्व सफाई कर्मचारी यांना दिले आहे.