मुलांना कामाला ठेऊ नये टि ई कराड -कामगार अधिकारी जालना मुलांना कामाला ठेवले आढळयास मालकावर व पालकावर गुन्हा नोंद करणार
परतूर /प्रतिनिधी
सध्या देशात कोरोना थैमान असल्यामुळे सर्व शाळा बंद आहे मुले ही घरी आहे
आशात पालक मुलांना काम वेबिगारी हॅटेल वर कामाला ठेवत आहे असे जिल्हा कामगार अधिकारी जिल्हा बाल संरक्षण कक्ष जालना चाईल्ड लाईन याच्या निदर्शनात आले त्यानी आज टिम करूण जुन्या मोढ्यातील विविध कापड दुकान हाॅटेल गोडाऊन यादि ठिकाणी भेटी देऊन दुकानदार याना सुचना देण्यात आली हॅटेल चहा टपरी भेळ या ठिकाणी बालकामगार कामाला ठेऊ नये तसेच मुलाच्या अधिकाराना समजुन घेऊया बालमजुरी ही मुलाच्या विकासाला घातक आहे हे समजुन घेऊया आणि इतराना पटवुन देउया तसेच जालना जिल्हातील बालमंजुरी विरोधी लढ्यात सहभागी होऊया तसेच आपल्या स्वाता च्या घरात सोसायटी टॅवर मध्ये .कारखान्यात दुकानात 18 वर्षाखालील मुलांना कामाला न ठेवणे आपल्या आसपास कामावर ठेवलेल्या मुला मुलीचे कोणत्याही प्रकारचे शोषन होत असल्यास लगेच या बाबतची महिती आपल्या शहरातील जिल्हातील बाल कल्याण समिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाईल्ड याच्याशी संपर्क करा अहवान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री शिवाजी नागरे टि ई कराड कामगार अधिकारी जालना यानी केले सोबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी एकनाथ राउत संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण गजानन इंगळे विधी सल्लागार आनंद भिसे सामजिक कार्यकतॅ संजय चव्हाण विनोद दाभाडे समुउपदेशन सुरेखा सातपुते अनिल लोखंडे चाईल्ड लाईनप्रकल्प चे सागर सोनवणे अनिता दाभाडे हे उपस्थित होते