भाजपाच्या आंदोलनाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अखेर बंदीवसातील मंदिरे उघडली --. देर आये..दुरुस्ती आये ...आठ महिन्यांनंतर मंदिरे उघडली परतुरात आ.बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत महादेव मंदिरात महाआरती

 -परतूर/प्रतिनिधी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यांपासून देशातील आणि राज्यातील सर्व मंदिरे बंद होती.काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मंदिरे उघडण्याची परवानगी दिली परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आजपर्यंत बंदीवासातील देवांची मंदिरे उघडण्याची परवानगी दिली नव्हती.भाविक भक्तांना मंदिरात दर्शनासाठी जाता येत नव्हते.यासाठी देशातील आणि राज्यातील साधू,संत,ऋषीमुनी यांनी तसेच भारतीय जनता पार्टीने मंदिरे उघडण्यासाठी मोठे आंदोलन केले होते.राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी म्हणून माजी मंत्री तथा आ.बबनराव लोणीकर यांनी स्वतः महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,मुख्य सचिव यांना पत्रे लिहिली होती आणि या पत्रात मंदिरे उघडण्याबाबत विनंती केली होती. तसेच युवा मोर्चाचा माध्यमातून युवा मोर्चाचे महाराप्ट्राचे महामंत्री राहूल लोणिकर यांच्या मार्गदर्शना खाली राज्यातील  आंदोलनाची आणि आ.लोणीकर यांच्या पत्राची दखल घेत राज्य सरकारने पाडव्यापासून राज्यातील मंदिरे उघडण्याची परवानगी देण्यात आली यानिमित्त आज सोमवारी (दि.१६) सकाळी राज्याचे माजी मंत्री तथा आ.बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत शहरातील महादेव मंदिराची दारे उघडून मंदिरात महाआरती करण्यात आली.यावेळी हर..हर..महादेवाचा गजर करण्यात आला.याप्रसंगी बोलताना आ.बबनराव लोणीकर म्हणाले की,राज्यातील मंदिरे आज महाविकास आघाडी सरकारने 'देर आये दुरुस्त आये' मंदिरे उघडली असून यामुळे भाविक भक्तांना राज्यातील पंढरपूर,तुळजापूर,आळंदी,शिर्डी,शेगाव,राजूर या प्रमुख मंदिरात आता दर्शन घेता येणार आहे.काही ठिकाणी खुले दर्शन न करता ऑनलाईन दर्शन करण्याची परवानगी दिल्याने अनेक भाविक भक्तांची अडचण होणार असल्याने आ.लोणीकर यांनी मास्क लावून कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्वांसाठी मंदिरे खुली करून मुक्त दर्शन ठेवावे अशी राज्यातील साधू संतांची,पुजाऱ्यांची मागणी आहे हे सांगून सरकारने लवकरच यासाठी परवानगी द्यावी असे सांगितले.यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते भगवान मोरे,ओम मोर,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संपत टकले,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे,युवा मोर्चा तालुका सरचिटणीस बंडू मानवतकर,युवा मोर्चा कोषाध्यक्ष अमर बगडीया,भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र मुंदडा,नगरसेवक कृष्णा आरगडे,संदिप बाहेकर,पद्माकर कवडे,अमोल अग्रवाल,मंगेश वाघमारे,विष्णू मचाले,शुभम कठोरे,भरत अंभुरे,किरण अंभुरे,श्यामसुंदर चित्तोडा यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत