माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची साधेपणाने दिवाळी साजरी,अनाथाश्रमातील मुलांना कपडे व फराळ वाटप करून केली दिवाळी

जालना(प्रतिनिधी) येथील स्वर्गीय शंकरलाल मुंदडा अनाथालया मध्ये अनाथ मुलांना कपडे व फराळाचे वाटप करून माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी आपली दिवाळी अतिशय साधेपणाने साजरी केली 
यावेळी संस्थेचे  वीरेंद्रजी धोका, दत्ता नाना आर्दड, अनाथ आश्रमाचे अधीक्षक राठोड ,नारायण पवार, सुनील राठी आदींची उपस्थिती होती
 गेल्या पाच वर्षापासून 
माजी मंत्री बबनराव लोणीकर परतुर येथील आपल्या निवासस्थानी व जालना येथे मातोश्री लॉन्स वर दीपावली पाडव्याला स्न्हेह मिलन कार्यक्रम आयोजित करत असतात परंतु यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर परतूर व जालना येथे दीपावली स्नेह संमेलनाचे आयोजन करता येणार नाही त्यामुळे प्रत्येक वर्षी दोन स्नेहमिलन सोबतच माजी मंत्री बबनराव लोणीकर वीरेंद्र जी धोका यांच्या अनाथ आश्रम मध्ये जाऊन दीपावली साजरी करत असतात मात्र या  वर्षी स्न्हेह मिलन कार्यक्रम होणार नसला तरी  माजी मंत्री लोणीकर यांनी स्वर्गीय शंकरलाल मुंदडा अनाथ आश्रम येथे जाऊन अनाथ मुलांसोबत दिवाळीचा आनंद घेत कपडे व फराळाचे वाटप करत अतिशय साधेपणाने दीपावली साजरी केली
 यावर्षी दिवाळी सणावर असलेले  कोरोनाचे सावट लक्षात घेता माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिवाळी सण घरात राहून साजरा करण्याचे आवाहन करण्यासोबतच परतूर व जालना येथे होणारी स्नेहसंमेलन रद्द करावे लागत असल्याची खंत असून, परतूर  व जालना येथे  जिह्यासह मतदारसंघातील जवळपास दहा हजार नागरिक या स्न्हेह मिलनाच्या माध्यमातून भेटीगाठी साठी येत असतात त्यात  व्यापारी,डॉक्टर, वकील, शिक्षक, समाजातील प्रतिष्ठीता बरोबर विचारांची देवाण, घेवाण होते मात्र या वर्षी कोरोना संकटा मुळे हा कार्यक्रम करता येणार नसला तरी अनाथ आश्रमातील मुलांसोबत दिवाळी साजरी करीत असल्यामुळे आपण आनंदी असल्याचे ते म्हणाले पुढे ते म्हणाले की जिल्ह्यातील नागरिकांनी दिवाळी सण साजरा करताना कोरोणा विषयी जागरूक राहून हा सण आनंदाने साजरा करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले व सर्वांना दीपावली व भाऊबीज, पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात