माजी मंत्री लोणीकरांच्या दणक्याने रेल्वे फाटक ते रेल्वे स्टेशन रस्ता पूर्वपदावर,उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे शहरातून होणाऱ्या ऊस वाहतुकीमुळे व्यापारी, नागरिकांना होणारा त्रास टळणार


परतुर (प्रतिनिधी)  रेल्वे फाटकावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे याठिकाणी रहदारीची होणारी कोंडी व शहरातील मुख्य रस्त्याने जाणाऱ्या जड वाहतुकी  सोबतच ऊसाची वाहने यामुळे शहरात होणारे प्रदूषण टळणार असून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या दणक्याने सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला व उड्डाणपुलाच्या बाजूने जाणाऱ्या रेल्वे स्टेशन कडील रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण केले असून यामुळे आष्टी रोड कडून शहरांमधून जाणारी उसाचे ट्रॅक्टर जड वाहतूक करणारी वाहने ही वाहने रेल्वे गेट कडून रेल्वे स्टेशन मार्गे जाणार असल्याने शहरात होणारे धुळीचे प्रदूषण यामुळे व्यापाऱ्यांना होणारा त्रास त्याचबरोबर दिवाळीच्या हंगामामध्ये होणारी वाहतूक कोंडी यांना चाप बसणार आहे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरील व्यापारी व ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,अधीक्षक अभियंता यांना फैलावर घेत आष्टी मार्गे येणाऱ्या वाहनांना उड्डाणपुलाच्या बाजूने पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा असे खडसावल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा होऊन हा मार्ग तात्काळ दुरुस्त केल्याने व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना होणारा वाहतूक कोंडी, उडणारी धूळ, त्यामुळे होणारे श्वसनाचे आजार या त्रासातून मुक्ती मिळणार असून नुकताच बांधकाम करण्यात आलेला शहरातील रस्ता ही अबाधित राहणार आहे त्यामुळे परतूर शहरातील व्यापारी, ग्राहक ,व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले