सर्व पक्षीय व गावकऱ्यांच्या वतीने तिर्थपुरी ग्रामपंचायत प्रशासकास निवेदन

घनसावंगी(प्रतीनीधी) तीर्थपूरी येथील ग्रामस्थांनी प्रशासक यांना निवेदन दिले निवेदनात सांगितल कि
 तिर्थपुरी येथे मुख्यमंत्री पेजजळ योजनेचे पाईप लाईन चे काम चालू आहे सदर कामासाठी गुत्तेदार श्री. वाघ यांनी गावातील अंतर्गत  सिमेट रोड पोकलेन ब्रेककरणे अक्षरस फोडून काढले गावातील सर्व रस्त्याची तोडफोड करून नास दुस केले आहे. हे सर्व करत असताना गावकऱ्यानी ग्राम विकास अधिकारी व प्रशासक यांना वरील काम थांबवणे बाबत विनंती केली होती परंतु त्यांना काही उपयोग झाला नाही.
गावातील रस्त्याच्या तोडफोडीमुळे आज रोजी गावात बैलगाडी, गुरेढोरे दुचाकी वाहन घालने  मुश्कील झाले आहे. त्याचप्रमाणे लहान मुलं महिला बरेच नागरिक यांना चांगले सुद्धा अवघड झाले आहे.गावातील सर्व सिमेंट रोड गेली पंधरा वर्षापासून विविध योजनेतून साधारण 50 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आले होते. त्यामुळे ते फोडण्याआधी रस्त्याच्या दुरूस्तीची तरतुद होणे आवश्यक होते. परंतु तसे काही झाले नाही. वरील प्रमाणे रस्त्यांची नासधुत ही प्रशासक श्री. नागलवाड साहेब ग्रामविकास अधिकारी श्री. मुपडे व गुत्तेदार श्री. वाघ यांनी अतिशय बेजबाबदार केली आसून त्याच्यावर कायदेशीर कारवाई त्याच्याकडून रुपये 50 लक्ष वरील रस्त्याच्या नुकसान पोटी वसूल करावेत व पुढील रस्ते हे दुरुस्तीचे तरतूद होई पर्यंत खोदू नये नसता आम्हाला जी.प. कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण करावे लागेल व होणर्या परिणामांस प्रशासक जबाबदार राहील. याची नोद घेऊन योग्य ती कारवाई तात्काळ आसे निवेदनात सांगितले आहे
प्रशासक नागलवड  व ग्रामसेवक . मूपडे  यांना निवेदन देण्यात आले यावेळी
 गणेशराव पवार, अंकुशराव बोबडे, तात्यासाहेब चिमणे, विजय चिमणे, सुधाकर मापरे, रमेश बोबडे, संतोष बोबडे, सचिन चिमणे

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले