परतुर पोलिसांनी विविध कार्यवाई मंध्ये पकडलेल्या एकविस लाख तेरा हजार सहाशे तीस रूपये किंमतीच्या गुटख्याची लावली विल्हेवाट




..............
परतुर प्रतिनिधी
आज परतुर येथे वखार महामंडळ जवळ च्या ग्राउंड वर परतुर पोलिसांच्या वतीने अवैध गुटख्याचा साठ्याची विलेवाट लावण्यात आली. एकविस लाख तेरा हजार सहाशे तीस रुपये किंमतीचा अवैद्य गुटखा पोलिस प्रशासनाने आज शुक्रवारी  ता.11 नष्ट केला आहे. विविध कार्यवाही मंध्ये पकडलेला गुटखा दि. २४-९-२०१९ गोवा (१०००) ५२ पुडे असलेल्या १५० गोण्या ची किंमत पंधरा लाख साठ हजार रुपये, दि २५-०४-२०२० गोवा चे १८ पॉकेट किंमत सहा हजार रुपये, दि. ०२-०५-२०२० गोवा चे १०४ पॉकेट किंमत छत्तिस हजार चारशे रूपये व सुगंधित तंबाखु चे ९६ पॉकेट ची किंमत पंचपीस हजार दोनशे तीस रुपये, दि.०८-०७-२०२० गोवा ६० पॉकेट ची किंमत आठरा हजार रूपये, दि.०१-१०-२०२० रोजी च्या कार्यवाही मंध्ये पकडले गोवा गुटखा १८७२ पॉकेट व सुगंधित सुपारी नखराली च्या १५६० पॉकेट ची किंमत चार लाख आड़ूसष्ट हजार रुपये किमतीचा एकूण साठा अन्न सुरक्षा अधिकारी नि.सु. कुलकर्णी यांच्या समक्ष नष्ट करण्यात आला. यावेळी परतुर पोलिस स्टेशन चे शिकाऊ आय पी एस  गौहर हसन,सहाय्यक निरीक्षक श्री.रवींद्र ठाकरे ,उपनिरीक्षक के.व्ही अंभोरे,गोपनीय शाखेचे  संजय वैद्य,कर्मचारी गणेश शिंदे,नितिन कोकने  बनसोडे, नवले मॅडम,पंच म्हणून अशोक बापुराव पवार सह इतर पोलिस कर्मचारी उपस्थितीत नष्ट करण्यात आल्या.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....